05 March 2021

News Flash

मराठमोळी स्मृती मानधना ठरली यंदाची सर्वोत्तम क्रिकेटपटू

ICCच्या यंदाच्या टी२० आणि एकदिवसीय संघातही स्मृतीला स्थान

क्रिकेटपटू स्मृती मंधाना

भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मानधना हिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून गौरविले आहे. वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूसाठी दिला जाणारा रॅचेल हेहो-फ्लिंट पुरस्कार जाहीर करण्यात आला. यासह स्मृतीला सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. तसेच २२ वर्षीय स्मृतीला २०१८च्या ICCच्या यंदाच्या टी२० आणि एकदिवसीय संघातही स्मृतीला स्थान देण्यात आले आहे.

 

स्मृतीने वर्षभरात १२ एकदिवसीय सामन्यात ६७च्या सरासरीने ६६९ धावा केल्या. तर २५ टी२० सामन्यांत सुमारे १३०च्या स्ट्राईक रेटने ६२२ धावा लगावल्या. स्मृतीच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने आयसीसी महिला वर्ल्ड कप टी२० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तिने या स्पर्धेत ५ सामन्यांत १२५.३५च्या स्ट्राईक रेटने १७८ धावा केल्या होत्या. ICC च्या महिला क्रिकेटपटूच्या एकदिवसीय आणि टी२० क्रमवारीतही ती अनुक्रमे चौथ्या व १०व्या स्थानी आहे.

याशिवाय, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज महिला क्रिकेटमधील ICC एकदिवसीय संघ आणि ICC टी२० संघाची घोषणा केली. महिला क्रिकेट खेळणाऱ्या सर्व संघांमधून सर्वोत्तम ११ खेळाडूंची निवड या संघामध्ये केली जाते. याबाबत अभिमानाची बाब म्हणजे भारताला यंदा टी२० विश्वविजेतेपद मिळवता आले नसले, तरी ICC Women’s T20I Team of the Year 2018 च्या कर्णधारपदाचा मान भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला देण्यात आला आहे. तर ICC Women’s ODI Team of the Year 2018 चे नेतृत्व सुझी बेट्स हिच्याकडे देण्यात आले आहे.

ICC Women’s T20I Team of the Year 2018 संघात हरमनप्रीतव्यतिरिक्त स्मृती मानधना आणि पूनम यादव या दोघींचा समावेश आहे. २०१८ साली झालेल्या टी२० विश्वचषकात या दोघींनीही उल्लेखनीय कामगिरी केली होती. ICC Women’s ODI Team of the Year 2018 मध्येदेखील या दोघींचा समावेश आहे. टी२० ची कर्णधार हरमनप्रीत मात्र एकदिवसीय संघात स्थान मिळवू शकली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2018 1:55 pm

Web Title: indias smriti mandhana become rachael heyhoe flint award winner and womens odi player of year 2018
Next Stories
1 अभिमानास्पद! भारताची हरमनप्रीत कौर ICCच्या टी२० संघाची कर्णधार
2 IND vs AUS : अर्धशतक ठोकूनही रोहित चौथ्या कसोटीला मुकणार
3 क्रिकेटपटू ते राजकारणी; बांगलादेशी कर्णधाराचा निवडणुकीत दणदणीत विजय
Just Now!
X