तिरंगी कनिष्ठ महिला हॉकी स्पर्धा
कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) : शर्मिला देवीने साकारलेल्या दुहेरी गोलच्या बळावर भारताने शनिवारी महिलांच्या तिरंगी कनिष्ठ हॉकी स्पर्धेत न्यूझीलंडचा ४-१ असा पराभव केला.
न्यूझीलंडने सामन्याच्या चौथ्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे आघाडी मिळवली. ऑलिव्हिया शेन्नॉनने न्यूझीलंडचे खाते उघडले. परंतु त्यानंतर भारतानेच वर्चस्व गाजवले. शर्मिला देवी (१२व्या आणि ४३व्या मिनिटाला), ब्युटी डुंगडुंग (२७व्या मिनिटाला) आणि लालरिंडकी (४८व्या मिनिटाला) यांनी भारताचे गोल नोंदवले. रविवारी भारताचा सामना यजमान ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 8, 2019 2:03 am