ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकांसाठी भारतीय संघची निवड करण्यात आली आहे. दोन टी-२० आणि पाच एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. भारतीय संघामध्ये बुमराह आणि कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन झाले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अपयशी ठरलेल्या के.एल राहुलाल भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. विश्वचषकासाठी केएल राहुलला तिसरा सलामीवीर म्हणून पडतळण्याची ही अखेरची संधी आहे. तर फिरकीपटू रविंद्र जाडेजा, खलील अहमद, सिराज यांना डच्चू देण्यात आला आहे. उमेश यादव आणि सिद्धार्थ कौल यांना संधी देण्यात आली आहे. एकदिवसीय सामन्यातून दिनेश कार्तिकला वगळण्यात आले आहे. विजय शंकर आणि पंतला टी-२० आणि एकदविसीय सामन्यात संधी दिली आहे. दोन टी-२० आणि पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात भुवनेश्वरला आराम देण्यात आला आहे.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध २४ फेब्रुवारीपासून दोन ट्वेन्टी-२० आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या विश्वचषकाआधी ही भारताची अखेरची स्पर्धा आहे. त्या पाश्र्वभूमीवर काही विशिष्ट जागांवर लक्ष केंद्रित केल्याचे संघनिवडीवरून दिसत आहे.

दोन टी-२० साठी भारतीय संघ –

विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, पंत, कार्तिक, धोनी, हार्दिक पांड्या, कृनाल, बुमराह, शामी, चहल, विजय शंकर, उमेश यादव, सिधार्थ कौल, मयांक मार्केंड्य

पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघ

विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायडू, केदार जाधव, धोनी, हार्दिक पांड्या, बुमराह, शामी, चहल, कुलदीप, विजय शंकर, पंत, सिधार्थ कौल, केएल राहुल

अखेरच्या तीन एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, विजय शंकर, रिषभ पंत, लोकेश राहुल