भारताच्या ताजिंदरपालसिंग तूरने पुरुषांच्या गोळा फेक इव्हेंटमध्ये टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता दर्शवली आहे. तूरने २१.१३ मीटरच्या आशियाई विक्रमाला मागे टाकले. त्याने २१.४९ मीटर लांब गोळा फेकत ऑलिम्पिक पात्रतेसाठी लागणाऱ्या २१.१० मीटरचा निकष पूर्ण केला. २६ वर्षीय तूरची पूर्वीची सर्वोत्कृष्ट कामगिरी २०.९२ मीटर अशी होती.

ट्रॅक आणि फील्डमध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला तूर ११वा भारतीय खेळाडू आहे. त्याने २१.४९ मी. च्या सलामीच्या फेकीतच ऑलिम्पिक कोटा मिळविला. २१.२८, २१.१३ आणि २१.१३ मीटर या त्याच्या फेकी होत्या.

 

हेही वाचा – इंडियन ग्रँड प्रिक्स : द्युती चंदच्या कामगिरीमुळे भारत ‘अ’ संघाला सुवर्ण

तूर म्हणाला, “येथे झालेल्या स्पर्धेत मला दिलासा मिळाला, कारण करोनामुळे आम्हाला चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी परदेशात जाणे शक्य झाले नाही. मी येथे उत्तम कामगिरी करू शकलो याचा मला आनंद आहे. माझे लक्ष्य २१.५० असे होते, जे मी पहिल्या फेकीत मिळवले.”