News Flash

ENG vs IND : मोहम्मद शमीसाठी केलेलं ‘ते’ ट्वीट ऋषभ पंतच्या आलं अंगाशी; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

शमी भारताच्या सर्वोत्तम कसोटी गोलंदाजांपैकी एक मानला जातो.

indias wicketkeeper batsman rishabh pant trolled for post on mohammed shamis birthday
ऋषभ पंत आणि मोहम्मद शमी

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा आज वाढदिवस आहे. ३ सप्टेंबर १९९० रोजी अमरोहा येथे जन्मलेला हा वेगवान गोलंदाज ३१ वर्षांचा झाला आहे. मोहम्मद शमी भारताच्या सर्वोत्तम कसोटी गोलंदाजांपैकी एक मानला जातो. त्याच्या स्विंग आणि वेगामुळे अनेक मोठ्या फलंदाजांना त्रास झालेला आपण पाहिले आहे. सध्या, शमी टीम इंडियासह इंग्लंड दौऱ्यावर आहे. जिथे त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आज शुक्रवारी टीम इंडियाच्या खेळाडूंनी मोहम्मद शमीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यष्टीरक्षक ऋषभ पंतने त्याला मजेदार पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण, पंतने केलेली पोस्ट त्याच्या अंगाशी आली आहे.

शमीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ऋषभ पंतने लिहिले, ”मोहम्मद शमी भाई, चेंडू आणि वय वेगाने पुढे जात आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा.” पंतने ही मजेदार पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली, पण त्यानंतर चाहत्यांनी पंतला चांगलीच उत्तरे दिली. तुझी वेळही संपत चालली आहे आणि तू असाच अपयशी ठरत राहिलास तर दुसरी कोणीतरी जागा घेईल, अशी एक प्रतिक्रिया पंतच्या पोस्टवर आली.

indias wicketkeeper batsman rishabh pant trolled for post on mohammed shamis birthday ऋषभ पंतचे ट्वीट

नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

 

indias wicketkeeper batsman rishabh pant trolled for post on mohammed shamis birthday पंतच्या पोस्टवर प्रतिक्रिया

 

हेही वाचा – ENG vs IND : ‘तो’ पुन्हा मैदानात परतला अन् इंग्लंडच्या क्रिकेटरला जाऊन धडकला; पाहा VIDEO

इंग्लंड कसोटी मालिकेत ऋषभ पंतला एकही अर्धशतक करता आले नाही. त्याने ६ कसोटी डावांमध्ये अवघ्या १६च्या सरासरीने ९६ धावा केल्या आहेत. यात पंतची सर्वोत्तम धावसंख्या ३७ धावा आहे. पंतने अशी कामगिरी केली, तर नक्कीच प्रश्न निर्माण होतील. आता जर तो ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या डावात फ्लॉप ठरला, तर टीम इंडिया शेवटच्या कसोटीत दुसरा यष्टीरक्षक वृद्धीमान साहाचा विचार करू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2021 6:31 pm

Web Title: indias wicketkeeper batsman rishabh pant trolled for post on mohammed shamis birthday adn 96
Next Stories
1 ENG vs IND : ‘तो’ पुन्हा मैदानात परतला अन् इंग्लंडच्या क्रिकेटरला जाऊन धडकला; पाहा VIDEO
2 महेंद्रसिंह धोनीनं निवृत्ती घेतली त्यादिवशी काय घडलं?; रवी शास्त्रींनी केला खुलासा
3 ENG vs IND : धैर्याला सलाम..! गुडघ्यातून रक्त वाहत असतानाही जेम्स अँडरसन करत होता गोलंदाजी