इंडोनेशियाचा दिग्गज बॅडमिंटनपटू मार्किस किडो याचे आज सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. बॅडमिंटन इंडोनेशियाने आपल्या अधिकृत ट्विटरवरुन ही माहिती दिली. ३६ वर्षीय किडो पुरुष दुहेरी प्रकारातील महान खेळाडू मानला जात होता. २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये पुरुष दुहेरीत त्याने हेंड्रा सेटिआवानसोबत सुवर्णपदक पटाकावले होते.

ऑलिम्पिक सुवर्णपदकाव्यतिरिक्त किडोने २००६च्या वर्ल्डकप दुहेरीत, २००७मध्ये विश्व चॅम्पियनशिपच्या दुहेरीत सुवर्णपदक जिंकले होते. एका वृत्तानुसार, बॅडमिंटन सामना खेळताना किडोचा मृत्यू झाला.

हेही वाचा – Euro Cup 2020 : चेक रिपब्लिकच्या खेळाडूचा ‘खतरनाक’ गोल, गोलकीपरच घुसला जाळ्यात!

 

 

 

 

भारतीय बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय, अजय जयराम आणि ज्वाला गुट्टा यांनी किडोच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.