04 December 2020

News Flash

सायना नेहवाल इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत दाखल

सायनासमोर कॅरोलिना मरिनचं आव्हान

भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवालने इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सायनाने उपांत्य फेरीत सहाव्या मानांकित बिंगजियाओची झुंज १८-२१, २१-१२, २१-१८ ने मोडून काढली. अंतिम फेरीत सायनासमोर पुन्हा एकदा कॅरोलिना मरिनचं आव्हान असणार आहे.

सायना सुरुवातीला ०-२ ने पिछाडीवर होती, पण काही चांगले फटके लगावत तिने ५-५ अशी बरोबरी साधली. त्यानंतर सायनाने ८-६ अशी आघाडी घेतली, पण बिंगजियाओने ब्रेकनंतर पुनरागमन करताना १७-१८ असा स्कोअर केला. सायनाचा फटका कोर्टबाहेर गेल्यामुळे बिंगजियाओने पहिला सेट २१-१८ ने जिंकला. सायनाने गेल्या वर्षीय राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण, आशियन गेम्समध्ये कांस्य आणि डेन्मार्क, इंडोनेशिया मास्टर्स व सैयद मोदी इंटरनॅशनल स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते.

दुसऱ्या गेममध्ये सायनाने आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या चुकीचा लाभ घेत सुरुवातीलाच ११-३ अशी आघाडी घेतली. त्यानंतर बिंगजियाओने सलग चार गुण वसूल केले. सायनाने क्रॉसकोर्टवर शानदार रिटर्नच्या मदतीने १७-९ अशी आघाडी घेतली. त्यानंतर चार गुण वसूल करील दुसरा गेम जिंकत १-१ अशी बरोबरी साधली. अखेरच्या गेममध्ये सायनाने कामगिरीत सातत्य राखताना बिंगजियाओला कुठली संधी दिली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2019 12:49 pm

Web Title: indonesia masters 2019 saina nehwal enters final will fight with carolina marin
टॅग Saina Nehwal
Next Stories
1 या संघापासून सावध रहा, न्यूझीलंड पोलिसांची विराटच्या संघाविरुद्ध नोटीस
2 क्रिकेटच्या मैदानातील सर्वात वयस्कर खेळाडू निवृत्त, वय ऐकून तुम्हालाही धक्का बसेल
3 IND vs NZ : भारताच्या ‘गब्बर’ला दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत स्थान
Just Now!
X