16 January 2021

News Flash

Indonesia Open : अटीतटीच्या सामन्यात प्रणॉय पराभूत; स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

Indonesia Open : उपांत्यपूर्व फेरीत २१-१७, २१-१८ असा पराभव

एच. एस. प्रणॉय

Indonesia Open : इंडोनेशियन ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा बॅडमिंटनपटू प्रणॉय याचा पराभव झाला. चीनच्या शी युकी याने प्रणॉयला २१-१७, २१-१८ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. या पराभवामुळे प्रणॉयचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

सामन्याआधीच युकी हा प्रणॉयवर भारी पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. कारण प्रणॉयला या स्पर्धेसाठी ८वे मानांकन देण्यात आले होते. पण त्याची झुंज जागतिक क्रमवारीत तिरस्य स्थानी असलेल्या युकीशी होती. अपेक्षेप्रमाणे युक्तीने अत्यंत सुंदर खेळ केला. पहिला गेम जिंकण्यासाठी युकीला थोडा संघर्ष करावा लागला. पण त्याने ४ गुणांच्या फरकाने हा गेम जिंकला. त्यानंतर दुसरा गेम अधिक अटीतटीचा झाला. या गेममध्ये एका क्षणाला दोघांचे गुण हे १८-१८ असे होते. पण युक्तीच्या चपळाईने प्रणॉयला मागे टाकले आणि गेमसह सामनाही जिंकला.

या स्पर्धेतून आघाडीचा बॅडमिंटपटू श्रीकांत आधीच बाहेर गेला होता. त्यामुळे पुरुष एकेरीत प्रणॉयकडून भारतीयांना अपेक्षा होत्या. पण आता प्रणॉयलाही स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2018 5:05 pm

Web Title: indonesia open hs prannoy out of tournament
टॅग Indonesia Open
Next Stories
1 जसप्रीत बुमरा वन-डे मालिकेतून ‘आऊट’; मुंबईकर शार्दूल ठाकूरला संधी
2 …जेव्हा दिनेश कार्तिकला बघून सौरव गांगुली म्हणाला होता ‘कुठून कुठून येतात हे लोक’
3 क्रिकेट टीममधून विदेश दौऱ्यांमध्ये होते मानवी तस्करी
Just Now!
X