08 August 2020

News Flash

Indonesia Open : सायना स्पर्धेबाहेर; चीनच्या युफेईकडून सरळ गेममध्ये पराभूत

Indonesia Open : स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत सायना नेहवाल हिचा चीनच्या चेन युफेई हिने २१-१८, २१-१५ असे सरळ गेममध्ये पराभव केला.

सायना नेहवाल

Indonesia Open : जकार्ता येथे सुरु असलेल्या इंडोनेशियन ओपन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत आज भारताची महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला पराभवाचा सामना करावा लागला. चीनच्या चेन युफेई हिने तिला २१-१८, २१-१५ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. या पराभवाबरोबर सायनाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

स्पर्धेच्या पहिल्या फेरीत सायनाने इंडोनेशियाच्या दिनार द्याह अयुस्टीन हिला २१-१२, २१-१२ अशा सरळ गेममध्ये पराभूत केले होते. या सामन्यात सायनाने पूर्ण वर्चस्व राखत पुढील फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे या सामन्यात जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेल्या सायनाकडून सुंदर खेळाची अपेक्षा होती. पण सायनाच्या समोर उभ्या ठाकलेल्या चीनच्या प्रतिस्पर्धी बॅडमिंटनपटूने तिला स्पर्धेत डोके वर काढू दिले नाही.

सामन्यातील पहिला गेमी काही प्रमाणात अटीतटीचा झाला. सामन्यातील पहिला गुण युफेईने कमावला आणि त्यानंतर तिने गन मिळवण्याचा तडाखा सुरूच ठेवला. सायनाने पहिल्या गेममध्ये १०-१० अशी बरोबरी साधत सामन्यात ‘कमबॅक’ करण्याचा प्रयत्न केला होता. पण तो प्रयत्न अपयशी ठरला आणि तिने पहिला गेम गमावला. दुसरा गेमदेखील पहिल्या गेमइतकाच रोमांचक होणार, अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती. पण हा गेम पहिली गेमपेक्षा झटपट संपला. चीनच्या युफेईने हा गेम आणि सामना आपल्या नावावर केला.

दरम्यान, काल झालेल्या पहिल्या फेरीत पी. व्ही. सिंधू हिने विजयी सलामी दिली आहे. थायलंडच्या पोर्न्पावी चोचुवाँग हिचा तिने २१-१५, १९-२१, २१-१३ असा पराभव केला असून दुसऱ्या फेरीत तिच्यापुढे जपानच्या अया ओहोरी हिचे आव्हान असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2018 3:50 pm

Web Title: indonesia open saina nehwal lost in 2nd round
Next Stories
1 …आणि झिम्बाब्वेचा संघ रात्रभर रस्त्यावरच झोपला
2 विराटला चीअर करायला अनुष्का इंग्लंडमध्ये दाखल
3 इंग्लंडच्या माजी कर्णधाराने उडवली टीम इंडियाची खिल्ली, भारतीयांनी घेतली ‘शाळा’
Just Now!
X