30 September 2020

News Flash

Indonesia President Cup – एकतर्फी सामन्यात मेरी कोमची बाजी, पटकावलं सुवर्णपदक

ऑस्ट्रेलियन प्रतिस्पर्ध्यावर ५-० ने मात

इंडोनेशियातील लाबुआन भागात सुरु असलेल्या मानाच्या President Cup स्पर्धेत भारताची सर्वोत्कृष्ट महिला बॉक्सर मेरी कोमने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ५१ किलो वजनी गटात मेरी कोमने आपल्या ऑस्ट्रेलियन प्रतिस्पर्धी एप्रिल फ्रेंक्सचा ५-० च्या फरकाने पराभव केला. आगामी ऑलिम्पिक स्पर्धा लक्षात घेता, मेरी कोमने ठराविक स्पर्धांमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही मेरी सहभागी झाली नव्हती.

मात्र २१ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेआधी सराव म्हणून मेरी कोमने President Cup स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला, आणि आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत मेरीने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2019 5:24 pm

Web Title: indonesia president cup mary kom beat her australian opponent and bags gold medal psd 91
Next Stories
1 चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मी कधीही तयार – ऋषभ पंत
2 भारतीय संघाला बदलाची गरज, प्रशिक्षकपदासाठी अर्ज केलेल्या रॉबिन सिंहचा शास्त्रींवर निशाणा
3 गोष्ट छोटी ‘हिमा’लयाएवढी!
Just Now!
X