ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांच्यासह पॅसिफिक देशांच्या एक हजार खेळाडूंना २०१७च्या आशियाई इनडोअर व मार्शल आर्ट्स स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळणार आहे.
अध्यक्ष शेख अहमद अल फहाद अल सबाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आशियाई क्रीडा परिषदेने या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. ही स्पर्धा तुर्केमेनिस्तान येथे होणार असून, स्पर्धेसाठी पाच अब्ज अमेरिकन डॉलर्स खर्चून ऑलिम्पिक क्रीडानगरी बांधण्यात येत आहे. या स्पर्धेत सहा हजार खेळाडू सहभागी होणार असून, त्यापैकी एक हजार खेळाडू पॅसिफिक देशांमधील असतील.