News Flash

IndVsSL T20: दुसरा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्यासाठी भारताचा संघ सज्ज

टीम इंडिया आज श्रीलंकेचा सुफडा साफ करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे

sri lanka vs india 2021 second t20 live streaming where and when to watch
टीम इंडिया

श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिका जिंकण्याच्या उद्देशाने भारतीय संघ आज मैदानात उतरणार आहे. भारताने पहिल्या सामन्यात श्रीलंकेला ३८ धावांनी पराभूत केले होते. दरम्यान संघात बदलांचे संकेत कमी आहेत. जर टीम मॅनेजमेंटने इंग्लंड मधली कसोटी दौर्‍यासाठी निवडले गेलेले पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला तर संघात बदल होऊ शकतात.

पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांना इंग्लंड दौर्‍यासाठी संघात स्थान मिळालं असलं तरी ते टी -२० मालिकेत खेळू शकतात. त्याला बीसीसीआयकडून तातडीने इंग्लंडला पाठवण्याविषयी चर्चा झालेली नाही. म्हणजेच दोन्ही खेळाडू ४ ऑगस्टपासून होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध होणार नाहीत. वॉशिंग्टन सुंदर, अवेश खान आणि शुभमन गिल या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर पृथ्वी आणि सूर्यकुमार यांना इंग्लंडला पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा- SL vs IND 1st T20 : भुवनेश्वर कुमारसमोर श्रीलंकेची घसरगुंडी, ‘धवनसेने’ची विजयी सलामी

टीम इंडियाने पहिला टी-२० सामना सहज जिंकला. अशा परिस्थितीत दुसर्‍या सामन्यात बदल होण्याची आशा फारशी कमी आहे. श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी प्रशिक्षक राहुल द्रविडने मालिका जिंकण्याचे आपले पहिले लक्ष्य असल्याचे म्हटले होते. अशा परिस्थितीत संघाचे प्रथम ध्येय मालिका जिंकणे असेल. तिसर्‍या टी -२० मध्ये संघात बदल होण्याची शक्यता आहे. यापूर्वी वनडे मालिका जिंकल्यानंतर संघाने अखेरच्या वनडे सामन्यात ५ मोठे बदल केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2021 2:09 pm

Web Title: indvssl t20 india ready to pocket the series by winning the second match srk 94
टॅग : Cricket
Next Stories
1 Tokyo 2020: भारतीय महिला बॉक्सर लव्हलिना उपांत्यपूर्व फेरीत धडक
2 Tokyo 2020: भारतीय हॉकी संघाचं दमदार पुनरागमन; ऑस्ट्रेलियाविरोधातील लाजिरवाण्या कामगिरीनंतर स्पेनचा पराभव
3 Tokyo 2020: “मी दोन दिवस काहीच खाल्लं नव्हतं”; मिराबाई चानूने केला खुलासा