चार दिवस धावांचा वर्षांव झालेल्या शेख झायेद स्टेडियमची खेळपट्टी जिवंत झाली आणि इंग्लंड-पाकिस्तान पहिल्या कसोटीचा पाचवा दिवस थरारक ठरला. पाकिस्तानच्या ५२३ धावांसमोर खेळताना इंग्लंडने ९ बाद ५९८ धावसंख्येवर आपला डाव घोषित केला. इंग्लंडला ७५ धावांची अल्पआघाडी मिळाली. आदिल रशीदच्या पाच बळींच्या जोरावर इंग्लंडने पाकिस्तानचा दुसरा डाव १७३ धावांत गुंडाळला. मिसबाह उल हकने सर्वाधिक ५१ धावा केल्या. इंग्लंडच्या आश्चर्यकारक प्रदर्शनामुळे त्यांना २१ षटकांत ९९ धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र अंधुक प्रकाश आणि सातत्याने फलंदाज बाद झाल्याने वेळ खर्ची पडला आणि निर्धारित षटकांचा खेळ होऊ शकला नाही. इंग्लंडला अनिर्णीत निकालावर समाधान मानावे लागले. इंग्लंडने ११ षटकांत ६.७२च्या सरासरीने ७४ धावा फटकावल्या. जो रूटने सर्वाधिक ३३ धावा केल्या. तीन सामन्यांची मालिका ०-० अशी बरोबरीत आहे. मॅरेथॉन खेळी साकारणाऱ्या अ‍ॅलिस्टर कुकला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.