News Flash

दुसऱ्या वनडेपूर्वी टीम इंडियाला धक्का, ‘मुंबईकर’ फलंदाज गेला संघाबाहेर

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत झाली दुखापत

भारतीय संघाच्या मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांमधून बाहेर पडला आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना श्रेयसच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. या सामन्यात भारतीय संघाने पाहुण्या संघाचा 66 धावांनी धुव्वा उडवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

https://images.loksatta.com/2021/03/ExKaJdIVkAgcSnO-2.jpg

इंग्लंड संघाची फलंदाजी सुरू असताना आठव्या षटकात शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोने मारलेला फटका रोखताना श्रेयसच्या ही दुखापत झाली. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. त्यानंतर श्रेयसला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. स्कॅनच्या अहवालानुसार, श्रेयस काही दिवस क्रिकेटपासून दूर राहणार आहे.

सूर्यकुमारला संधी?

आता शुक्रवारी भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना होणार आहे. त्यामुळे श्रेयसचा बदली खेळाडू म्हणून भारतीय संघव्यवस्थापनाकडून सूर्यकुमार यादवला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पणाची संधी मिळू शकते. खांद्यांच्या हाडाला झालेली दुखापत ठीक होण्यास जवळपास सहा आठवड्यांचा वेळ लागतो. शिवाय शस्त्रक्रिया झाली तर, त्यापेक्षाही जास्त कालावधी लागतो. त्यामुळे टी-20 मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर संधी मिळू शकते.

दिल्लीचे कर्णधारपद कोणाला?

क्रिकबझच्या वृत्तानुसार, दुखापत मोठी असल्याने आयपीएलच्या 14व्या सत्रातील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये श्रेयस खेळणार नसल्याचे समोर आले आहे. आयपीएलमध्ये तो दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार आहे. श्रेयसच्या गैरहजेरीत ऋषभ पंत, अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ आणि रविचंद्रन अश्विन हे दिल्लीचे नेतृत्व करू शकतात. यंदाच्या हंगामात दिल्ली आपला पहिला सामना 10 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्जशी खेळणार आहे.

दुसऱ्यांदा खांद्याला दुखापत

गेल्या सहा महिन्यात अय्यरच्या खांद्याला झालेली ही दुसरी दुखापत आहे.  याआधी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर मर्यादित षटकांच्या मालिकेत त्याला खांद्याला दुखापत झाली होती. इंग्लंडसह मर्यादित षटकांच्या मालिकेत सामील होण्यापूर्वी अय्यरने मुंबईकडून विजय हजारे ट्रॉफीमध्ये केवळ चार सामने खेळले होते, त्यामध्ये त्याने दोन शतकेही ठोकली होती.

अय्यरच्या दुखापतीमुळे इंग्लिश काउटी क्लब लँकेशायरही चिंतेत आहे. आगामी  रॉयल लंडन कपसाठी लँकेशायरने अय्यरशी करार केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2021 7:09 pm

Web Title: injured shreyas iyer ruled out of final two odi against england adn 96
टॅग : Shreyas Iyer
Next Stories
1 पॅरा नेमबाजी विश्वचषक: मनीष नरवालला विक्रमी सुवर्णपदक
2 ICC T20 RANKINGS: विराट कोहलीला फायदा, राहुलची घसरण
3 मुंबई इंडियन्सच्या ‘स्फोटक’ फलंदाजाच्या वडिलांचे निधन
Just Now!
X