News Flash

“मी लवकरच परत येईन!” दुखापतीनंतर श्रेयस अय्यरची चाहत्यांसाठी भावनिक पोस्ट!

दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरनं क्रिकेट चाहत्यांसाठी ट्वीटरवर एक संदेश दिला आहे.

फोटो सौजन्य - श्रेयस अय्यर ट्वीटर हँडल

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झालेला टीम इंडियाचा मधल्या फळीचा फलंदाज श्रेयस अय्यर या मालिकेतल्या उरलेल्या दोन्ही एकदिवसीय सामन्यात खेळू शकणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे. त्यासोबतच श्रेयस अय्यर IPL 2021 ला देखील मुकणार असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर श्रेयसच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यानंतर श्रेयसनं आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये “मी लवकरच परत येईन”, असं वचन श्रेयसनं भारतीय क्रिकेट चाहत्यांना दिलं आहे.

काय म्हणाला श्रेयस ट्वीटमध्ये?

श्रेयस अय्यरनं केलेल्या ट्वीटमध्ये चाहत्यांचे आभार मानले आहेत. “मी तुम्हा सगळ्यांचे मेसेज वाचतोय. तुमचं प्रेम आणि पाठिंब्यासाठी मी मनापासून आपला आभारी आहे. पण तुम्हाला माहितीये, जेवढा जोरदार झटका, तेवढंच ताकदीनं पुनरागमन (द ग्रेटर द सेटबॅक, द स्ट्राँगर द कमबॅक). मी लवकरच परत येईन!” असं श्रेयसनं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. क्षेत्ररक्षण करताना श्रेयस अय्यरला डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे.

 

श्रेयस अय्यरच्या दुखापतीचा टीम इंडियासोबतच त्याची आयपीएल टीम दिल्ली कॅपिटल्सला देखील फटका बसला आहे. गेल्या आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालीच दिल्ली कॅपिटल्सनं झोकात आयपीएल फायनलपर्यंत धडक मारली होती. यामध्ये १७ सामन्यांमध्ये श्रेयसनं तब्बल ५१९ धावा कुटल्या होत्या. त्यामुळे आता दिल्लीच्या १० एप्रिलला होणाऱ्या आयपीएलमधील पहिल्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जचा सामना कसा करायचा, याची वेगळी रणनीती दिल्ली कॅपिटल्सला आखावी लागणार आहे.

Ind vs Eng: दणदणीत विजयानंतर टीम इंडियाला मोठा धक्का, दोन महत्त्वाचे खेळाडू झाले जायबंदी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 7:39 pm

Web Title: injured shreyas iyer tweet saying i will be back soon ind vs eng series pmw 88
टॅग : Cricket News,IPL 2021
Next Stories
1 IPL : “माझ्यासाठी लार्ज साइज प्लिज”, धोनीने नवीन जर्सी लाँच करताच जडेजाची स्पेशल ‘डिमांड’!
2 IPL मध्ये पहिल्यांदाच चेन्नईची जर्सी बदलली, खांद्यावर दिसेल लष्कराचा ‘कॅमोफ्लॉज’; धोनीने केलं अनावरण
3 आज गहुंजेत ‘सूर्य’ तळपणार?
Just Now!
X