ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सुरुवातीच्या सामन्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकरिता अनुपलब्ध असेल. विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवणाऱ्या स्टार्कला दुखापत झाली होती.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणाऱ्या स्टार्कच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे पुढील तीन आठवडे
त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.