पाच सामन्याची टी २० मालिका आधीच गमावलेल्या न्यूझीलंड संघाला दुखापतीचं ग्रहण लागले आहे. आघाडीचे अनेक खेळाडू दुखापतीमुळे हैराण आहेत. परणामी भारताविरोधात होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यासाठी न्यूझीलंडने आपल्या संघात नवख्या गोलंदाजांना संधी दिली आहे. पाच फेब्रुवारीपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान तीन सामन्याची एकदिवसीय मालिका होणार आहे.

दुखापतीमुळे संघातील अनुभवी गोलंदाज ट्रेंट बोल्ट, लोकी फर्ग्युसन आणि मॅट हेनरी यासारखे गोलंदाज उपलबद्ध नाहीत. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघात नवख्या गोलंदाजांची निवड करण्यात आली आहे. भारताविरोधाच्या मालिकेत कायल जेमिसनला पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. स्कॉट कगीलेन आणि हामिश बेनेट यांनी मोठ्या कालावधीनंतर संघात पुनरागमन केलं आहे.

२०१९ च्या विश्वचषकात अंतिम सामन्यातील पराभवानंतर न्यूझीलंडचा पहिली एकदिवसीय मालिका असेल. विश्वचषकात भारताच्या स्वप्नांवर न्यूझीलंडने पाणी फेरलं होतं. आता हे दोन्ही संघ पुन्हा एक आमनेसामने आले आहेत. पाच सामन्याच्या टी-२० मालिकेत न्यूझीलंड ३-० ने पिछाडीवर आहे.


न्यूझीलंडचा एकदिवसीय मालिकेसाठी संघ –
केन विल्ययम्सन (कप्तान), हामिश बेनेट, टॉम ब्लंडेल, कोलिन डी ग्रैंडहोम, मार्टिन गप्टिल, काइल जेमिसन, स्कॉट कगिलेन, टॉम लाथम, जिमी नीशाम, हेनरी निकोल्स, मिशेल सेंटनर, ईश सोढ़ी (पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी), टिम साउदी आणि रॉस टेलर.

एकदिवसीय मालिकेचा कार्यकम-
(सर्व सामने भारतीय वेळेनुसार सकाळी ७.३० वाजता सुरू होणार)

पहिला एकदिवसीय सामना : हॅमिल्टन- ०५ फेब्रुवारी २०२०
दुसरा एकदिवसीय सामना : ऑकलंड-०८ फेब्रुवारी २०२०
तिसरा एकदिवसीय सामना : माऊंट माउंगानुई- ११ फेब्रुवारी २०२०