News Flash

क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्याची ‘बीसीसीआय’ची अनोखी शक्कल!

दौऱयाचे वेळापत्रक 'बीसीसीआय'ने आपल्या ट्विटर किंवा फेसबुक अकाऊंटवर जाहीर केलेले नाही

क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्याची ‘बीसीसीआय’ची अनोखी शक्कल!
दौऱयाचे वेळापत्रक 'बीसीसीआय'ने आपल्या ट्विटर किंवा फेसबुक अकाऊंटवर जाहीर करण्याऐवजी संघातील खेळाडूंना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर वेळापत्रकाची माहिती जाहीर करायला सांगितली.

जास्तीत जास्त क्रिकेट चाहत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय) सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करताना पाहायला मिळत आहे. भारतीय संघाच्या आगामी काळातील दौऱयांसाठीच्या संघातील खेळाडूंची माहिती ‘बीसीसीआय’ने आपल्या ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केली होती. पण या दौऱयांचे वेळापत्रक जाहीर करताना ‘बीसीसीआय’ने एक अनोखी शक्कल लढवली आहे. यंदा सप्टेंबर महिन्यात न्यूझीलंडचा संघ तीन कसोटी आणि ५ एकदिवसीय सामन्यांसाठी भारत दौऱयावर येणार आहे. या दौऱयाचे वेळापत्रक ‘बीसीसीआय’ने आपल्या ट्विटर किंवा फेसबुक अकाऊंटवर जाहीर करण्याऐवजी संघातील खेळाडूंना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर वेळापत्रकाची माहिती जाहीर करायला सांगितली.

भारताचा कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या वेळापत्रकाची माहिती ट्विट केली. त्यानंतर रिशी धवनने पहिल्या एकदिवसीय सामन्याची माहिती आपल्या चाहत्यांना ट्विटरवर दिली. पाठोपाठ शिखर धवनने दुसऱया एकदिवसीय सामन्याचे वेळापत्रक ट्विट केले. न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्याची माहिती भारतीय संघाचे नवनिर्वाचित प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी दिली आहे. देशासह जगभरातील जास्तीत जास्त नेटिझन्सपर्यंत पोहोचण्यासाठी ‘बीसीसीआय’च्या या कल्पनेचे कौतुक केले जात आहे. संघातील खेळाडूंनी वेळापत्रकाची माहिती दिल्यामुळे जास्तीत जास्त क्रिकेट रसिकांपर्यंत ‘बीसीसीआय’ला पोहोचता येते, असा यामागचा हेतू असल्याचे ‘बीसीसीआय’चे म्हणणे आहे.

पाहा ‘बीसीसीआय’च्या पुढाकारानंतर खेळाडूंनी अशी दिली वेळापत्रकाची माहिती-

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2016 2:55 pm

Web Title: innovative idea from bcci to announce tour dates
Next Stories
1 गांगुलीला माझा काय ‘प्रॉब्लेम’ आहे, हे त्यालाच विचारा- रवी शास्त्री
2 मेस्सी, निवृत्तीचा निर्णय मागे घे; अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षांची मागणी
3 इटलीने स्पेनचा अश्वमेध रोखला
Just Now!
X