भारतीय अंध क्रिकेट संघाने पाकिस्तानला धूळ चारत विश्वचषक जिंकून दिला. त्यांनी केलेली कामगिरी माझ्यासारख्या क्रिकेटपटूला प्रेरणा देणारी आहे, असे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघाचा  आघाडीचा फलंदाज केदार जाधव याने केले,

रविवारी माध्यान्ह आरतीपूर्वी केदार जाधव याने  मित्रांसोबत साईसमाधीचे दर्शन घेतले. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांचा उदी व शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी केदार जाधव म्हणाला की, भारतीय क्रिकेट महिला आणि पुरुष भारतीय क्रिकेट संघात उत्तम कामगिरी करत असताना आता त्यापाठोपाठ भारतीय अंध क्रिकेटपटूंनीही आपण मागे नसल्याचे उदाहरण दाखवत देशाला  विश्वचषक जिंकून दिला. त्यामुळे मला या क्रिकेटपटूंचा खूप अभिमान आहे.  साईंचे दर्शन घेऊन प्रसन्नता वाटते तसेच नवीन ऊर्जा मिळते असेही केदार जाधव यांनी सांगितले.

क्रिकेटमध्ये भारतीय संघ अशीच उत्तोमउत्तम कामगिरी करत विश्वाच्या नजरा कामगिरीच्या माध्यमातून भारतावर खिळून राहाव्यात अशी प्रार्थना साईबाबांकडे केली. भारतीय पुरुष संघ सातत्यपूर्ण अशी कामगिरी करत आहेत, त्याचबरोबर महिला संघाची ही आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली छाप पाडत आहे. त्यानंतर आता, काल भारतीय अंध संघाने सुमार कामगिरी करत विश्वविजेतेपदाला गवसणी घातली आहे, त्यामुळे त्या संघाचे कौतुक करावे तितके थोडे आहे. त्यामुळे क्रिकेट खेळाची प्रगती पाहता हा आलेख उंचावलेला आहे. ही बाब आपल्यासाठी निश्चितच अभिमानस्पद आहे.