24 November 2020

News Flash

भारतीय संघाला बरोबरीची गरज

भारताने स्पर्धेत सलग दोन विजयांसह सहा गुणांची कमाई केली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

आंतरखंडीय फुटबॉल स्पर्धा

पुढील वर्षी बहारिन येथे होणाऱ्या ‘एएफसी’ १६ वर्षांखालील फायनल्स फुटबॉल स्पर्धेकरिता पात्र ठरण्यासाठी भारतीय संघाला रविवार यजमान उझबेकिस्तानविरुद्ध होणारा सामना बरोबरीत राखणे आवश्यक आहे.

भारताने रविवारचा सामना बरोबरीत राखल्यास किंवा विजय मिळवल्यास ते आंतरखंडीय १६ वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारतील. भारताने या स्पर्धेत सलग दोन विजयांसह सहा गुणांची कमाई केली आहे. भारताने तुर्कमेनिस्तान आणि बहारिनविरुद्धचे सामने ५-० अशा फरकाने जिंकले आहेत. नियमानुसार, ११ गटातील विजेते आणि दुसऱ्या क्रमांकावरील सर्वोत्तम चार संघ एएफसी १६ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2019 1:14 am

Web Title: inter divisional football tournament indian team needs equalization abn 97
Next Stories
1 राष्ट्रीय कार रॅली स्पर्धेत अपघातादरम्यान तिघांचा मृत्यू
2 प्रो कबड्डी लीग : जयपूरची गुजरातशी बरोबरी
3 ठाणे, पुणे, नाशिक संघांची उपांत्य फेरीत धडक
Just Now!
X