21 September 2020

News Flash

ब्राझीलला धक्का!

जागतिक क्रमवारीत फारसे स्थान नसलेल्या मेक्सिकोसारख्या संघाने मंगळवारी झालेल्या सामन्यात बलाढय़ ब्राझीलला एकही गोल करू दिला नाही. याचा परिणाम अर्थातच सट्टेबाजारावर झाला. मेक्सिकोबरोबरच्या सामन्यामुळे सट्टेबाजारात

| June 19, 2014 12:07 pm

जागतिक क्रमवारीत फारसे स्थान नसलेल्या मेक्सिकोसारख्या संघाने मंगळवारी झालेल्या सामन्यात बलाढय़ ब्राझीलला एकही गोल करू दिला नाही. याचा परिणाम अर्थातच सट्टेबाजारावर झाला. मेक्सिकोबरोबरच्या सामन्यामुळे सट्टेबाजारात ब्राझील संघाचा भाव काही प्रमाणात घसरला आहे, तरीही गटात अद्याप अव्वल क्रमांक मिरविणाऱ्या ब्राझीलला अर्जेटिना आणि जर्मनी या संघांनी सट्टय़ाच्या रूपाने कडवे आव्हान निर्माण केले आहे. सट्टेबाजारात आठव्या क्रमांकावर असलेल्या बेल्जियमने अल्जेरियाविरुद्धच्या सामन्यात चांगला खेळ केल्यानंतर त्यांचाही भाव वधारला आहे. सर्वाधिक गोल करणाऱ्यांमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोचा भाव आता घसरला आहे. जर्मनीच्या थॉमस म्युलरने आता आघाडी मिळविली आहे. त्यापाठोपाठ लिओनेल मेस्सी, नेयमारचा भाव घसरून ती जागा नेदरलँडच्या रॉबेन व्ॉन पर्सीने घेतली आहे. स्पेनविरुद्धच्या सामन्यात कमालीचा खेळ दाखविणाऱ्या पर्सीला आता सट्टेबाजारात मागणी येऊ लागली आहे. सट्टेबाजारात आता चांगलीच रंगत येऊ लागली आहे. ब्राझील, अर्जेटिना आणि जर्मनीचा बोलबाला आहे; परंतु या खेळात कधीही काहीही होऊ शकते, याची कल्पना असलेल्या भारतीय सट्टेबाजांनी सावध खेळीवरच भर दिला आहे. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अनेक वेबसाइट्स फुलून गेल्या आहेत. या वेबसाइटवर काही वेळा अनपेक्षित भावही नोंदले जात आहेत. प्रत्येक दिवशी होणाऱ्या चढउताराने सट्टेबाजाराला आता रंगत आली आहे.
आजचा भाव :
१. कोलंबिया         आयव्हरी कोस्ट
९० पैसे (१५/१३);    पावणेतीन रुपये (१४/५)
२. उरुग्वे         इंग्लड
५५ पैसे (२७/१०);    दीड रुपया (६/५)
३. जपान         ग्रीस
४५ पैसे  (६/५);        सव्वा रुपया (२७/१०)

गुगल डुडल फुटबॉलमय

कोणत्याही माहितीची शोधाशोध करण्यासाठी आपण तडक धाव घेतो ते ठिकाण म्हणजे गुगल. वेगवेगळ्या घटना, प्रसंग, आठवणींच्या निमित्ताने गुगल डुडल कल्पक आणि अनोख्या संकल्पनांसह होमपेजची रचना करते. फुटबॉल विश्वचषकाचा फीव्हर आता जगभर व्यापू लागला आहे. या महासोहळ्याची दखल घेत गुगल डुडल फुटबॉलमय झाले आहे. ब्राझीलमधील वस्तीला फॅव्हेला असे म्हटले जाते. रंगीबेरंगी घरांची रचना आणि यामध्ये रंगणाऱ्या फुटबॉलसाठी फॅव्हेला ओळखल्या जातात. फॅव्हेला आणि फुटबॉल हे ब्राझीलच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहेत. गुगलने होमपेजवर या फॅव्हेलाचीच प्रतिकृती मांडली. या घरांमध्ये गुगल हे शब्द पेरून एल हे अक्षर फुटबॉल खेळताना दिसत आहे. मेक्सिकन वेव्हच्या रचनेनंतर पॉल ऑक्टोपसही होमपेजवर अवतरला होता. दोन बाजूंना दोन संघांचा झेंडा असलेले पेटारे आणि आपल्या बाकदार शेपटीद्वारे विजयी संघ वर्तवणारा चॉकलेटी रंगाच्या ऑक्टोपसचे होमपेज नेटिझन्समध्ये प्रचंड लोकप्रिय झाले.

थ्री-इडियट्स!
भरजरी वस्त्रे, जिरेटोप अशा शाही पेहरावात एरिना पॅन्टनल परिसरात अवतरलेले हे तिघेजण कोणत्याही रंगभूमीवर ऐतिहासिक पात्र वठवण्यासाठी निघालेले नाहीत, तर रशियाविरुद्धच्या लढतीसाठी हजर राहिलेले हे दक्षिण कोरियाचे चाहते आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2014 12:07 pm

Web Title: interesting news from fifa football world cup event
Next Stories
1 जपानपुढे ग्रीसचे आव्हान
2 इंग्लंड दौरा खडतर-द्रविड
3 इंडोनेशिया बॅडमिंटन स्पर्धा : सायनाची विजयी सलामी
Just Now!
X