News Flash

आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल : रोनाल्डोच्या गोलमुळे पोर्तुगालचा विजय

या गोलमुळे देशातर्फे सर्वाधिक गोल करण्याच्या विक्रमाच्या दिशेने रोनाल्डोने कूच केली आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डो

लिस्बन : ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेल्या एकमेव गोलमुळे पोर्तुगालने आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल लढतीत अँडोरा संघावर ७-० असा दणदणीत विजय मिळवला.

या गोलमुळे देशातर्फे सर्वाधिक गोल करण्याच्या विक्रमाच्या दिशेने रोनाल्डोने कूच केली आहे. रोनाल्डोचे १०२ गोल झाले असून सर्वाधिक १०९ गोलचा विक्रम इराणच्या अली दाएई यांच्या नावावर आहे.  गुडघ्याच्या दुखापतीमुळे तसेच करोनाच्या संसर्गातून बरे झाल्यानंतर रोनाल्डोने पुनरागमन केले असून मध्यंतरानंतर मैदानावर उतरलेल्या रोनाल्डोने ८५व्या मिनिटाला गोल करत पोर्तुगालला ६-० अशी आघाडी मिळवून दिली होती.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2020 3:04 am

Web Title: international friendly football ronaldo goal wins portugal zws 70
Next Stories
1 कृणाल पांड्याला मुंबई विमानतळावर रोखण्यात आलं, अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु
2 IND vs AUS: रोहितच्या मुद्द्यावरून संजय मांजरेकर पुन्हा संतापले, म्हणाले…
3 २०२१ चा टी-२० विश्वचषक भारतातच ! ICC कडून शिक्कामोर्तब
Just Now!
X