28 November 2020

News Flash

आयओसीचा गैरसमज दूर करण्याची गरज – उषा

भारतामधील प्रत्येक क्षेत्रात राजकारणाचा समावेश असतो आणि जर काही समस्या निर्माण झाली तर ती दूर करण्यासाठी येथे उपाययोजना केली जाते

| September 7, 2013 02:51 am

भारतामधील प्रत्येक क्षेत्रात राजकारणाचा समावेश असतो आणि जर काही समस्या निर्माण झाली तर ती दूर करण्यासाठी येथे उपाययोजना केली जाते, असे समजावून देतानाच, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) भारतीय ऑलिम्पिक महासंघा (आयओए) विषयी असलेले गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे, असे ज्येष्ठ ऑलिम्पिक धावपटू पी.टी. उषा हिने सांगितले.
आयओएने सादर केलेला तडजोडीचा प्रस्ताव आयओसीने फेटाळला आहे. त्या संदर्भात उषा म्हणाली, आपल्या देशातील कायदे व नियमावलीनुसार क्रीडा क्षेत्राचा कारभार केला जात असतो. भारतामधील क्रीडा क्षेत्राच्या व्यवस्थापन पद्धतीविषयी आयओसीने गैरसमज करून घेतला आहे. आपल्या पद्धतीनुसारच येथे क्रीडा क्षेत्राचे नियोजन व आयोजन केले जात असते. या पद्धतीविषयी आयओसीला फारशी माहिती नाही. त्यामुळेच दोन संघटनांमध्ये वाद निर्माण झाले आहेत.
भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या क्रीडा संघटकांना आयओएमध्ये स्थान देऊ नये, अशी मागणी ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय धावपटू अश्विनी नचप्पा हिने केली आहे. त्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करण्यास उषाने नकार दिला. ती म्हणाली, क्रीडा संघटनांच्या व्यवस्थापनात राजकीय व्यक्तींच्या सहभागाविषयी माझा विरोध नाही, मात्र संघटनांचा कारभार पारदर्शी व्हावा हीच अपेक्षा असते.

    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 2:51 am

Web Title: international olympic committee has misunderstood something p t usha
Next Stories
1 ‘शक्ति’मान!
2 सानिया-झेंग पराभूत
3 पेस-स्टेपानेक अंतिम फेरीत
Just Now!
X