पुरूषांमध्ये सेनादल तर महिलांमध्ये केरळने येथे आयोजित राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद मिळविले.
जिल्हा तलवारबाजी संघटनेतर्फे येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी महिलांच्या वैयक्तिक गटात केरळने इपी, सॅबर, फॉइल या तिन्ही प्रकारात, तर, पुरुषांमध्ये इपी प्रकारात मध्यप्रदेश, सॅबरमध्ये जम्मु काश्मिर, फॉइलमध्ये सेनादलने सुवर्ण मिळविले. सॅबरमध्ये महाराष्ट्राच्या स्नेहल विधातेला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.