News Flash

पेसला आयपीटीएलमध्ये सामील करण्याची योजना होती -भूपती

तो चाहत्यांचे मनोरंजन करणारा खेळाडू आहे.

| November 28, 2015 12:06 am

‘‘इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीग स्पर्धेच्या पहिल्या हंगामात लिएण्डरने पेसने खेळावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र तो चॅम्पियन्स टेनिस लीगसाठी करारबद्ध झाला होता. तो चाहत्यांचे मनोरंजन करणारा खेळाडू आहे. त्याला समाविष्ट करण्यासाठी खूप प्रयत्न केले,’’ अशा शब्दांत आयपीटीएलचा संस्थापक महेश भूपतीने आपल्या भावना व्यक्त केल्या.
आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये दुहेरी प्रकारात भारतीय तिरंगा अभिमानाने फडकावण्याचे श्रेय लिएण्डर पेस आणि महेश भूपती जोडीला जाते. मात्र अहंकारच्या कारणास्तव ही जोडी विलग झाली आणि भारतीय टेनिसचे नुकसान झाले. मात्र आयपीटीएलच्या निमित्ताने या दुराव्याचे जवळीकीत रुपांतर होण्याची चिन्हे आहेत. पेस या स्पर्धेत जपान वॉरियर्सचे प्रतिनिधित्व करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2015 12:06 am

Web Title: international tennis premier league 2
Next Stories
1 ललिता घरतवरील अन्यायाविरोधात रत्नागिरी कबड्डी असोसिएशन आक्रमक
2 पंचांना शिवीगाळ प्रकरणी शकीबवर बंदी
3 भारताचा द.आफ्रिकेवर दणदणीत विजय
Just Now!
X