23 October 2020

News Flash

लग्नाला का बोलावलं नाहीस?? राशिद खानने घेतली मनिष पांडेची फिरकी

मनिष पांडे अडकला विवाहबंधनात

भारतीय संघाचा मधल्या फळीतला महत्वाचा खेळाडू मनिष पांडे नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला. अभिनेत्री अश्रिता शेट्टीशी मनिष पांडेंने लग्न केलं असून सोमवारी मुंबईत हा सोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याची क्षणचित्र सोशल मीडियावर आल्यानंतर, भारतीय संघातील मनिष पांडेंच्या सहकाऱ्यांनी त्याचं अभिनंदन केलं.

मनिष पांडेचा आयपीएलमधील सहकारी राशिद खाननेही ट्विटरवरुन मनिषचं अभिनंदन केलं आहे. यावेळी राशिदने मनिषला, मला लग्नाला का बोलावलं नाहीस?? असं म्हणत त्याची फिरकी घेतली. मनिष आणि राशिद आयपीएलमध्ये सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळतात.

लग्नसोहळ्यानंतर मनिष पांडे वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिकेसाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे मनिषच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2019 3:40 pm

Web Title: invite kyun nahi kiya rashid khan hilariously asks manish pandey while wishing the latter on his wedding psd 91
टॅग Ipl,Rashid Khan
Next Stories
1 IPL 2020 : भाजपा खासदार दिल्ली कॅपिटल्स संघाचा सहमालक होण्याच्या तयारीत
2 विश्वचषकासाठी संघात केवळ एक जागा शिल्लक!! कर्णधार विराटचे सूचक संकेत
3 “कायद्याच्या रक्षकांचा समाजातील राक्षसांवर विजय”
Just Now!
X