भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने इंग्लंडविरोधात केलेल्या झुंजार खेळीची क्रिकेट विश्वाने दखल घेतली असून सर्व स्तरातून त्याचं कौतुक केलं जात आहे. इंग्लंडविरोधातील चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतने शतकी खेळी करत भारताला सामन्यासोबतच मालिका विजयाचा मार्ग मोकळा करुन दिला. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंझमामनेही ऋषभ पंतच्या आक्रमक खेळीचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. पंत जेव्हा कधी फलंदाजी करतो तेव्हा आपण सेहवागलाच डाव्या हाताने खेळताना पाहत असल्याचा भास होत असल्याचं इंझमामने म्हटलं आहे. कितीही दबाव असला तरी फरक पडत नाही हा सेहवागचा गुणधर्म पंतमध्येही असल्याचं इंझमामने म्हटलं आहे.

Ind vs Eng: ऋषभ पंतची झुंजार खेळी पाहून गांगुली आश्चर्यचकित; म्हणाला…

“ऋषभ पंत अतिशय़ उत्तम खेळाडू आहे. खूप दिवसांनी मी असा खेळाडू पाहिलाय ज्याच्यावर दबावाचा कोणताही परिणाम होत नाही. १४६ धावांवर सहा गडी बाद झालेले असतानाही ज्या पद्धतीने तो सुरुवात करतो, तसं कोणीही करत नाही. तो आपले शॉट खेळत असतो आणि यावेळी खेळपट्टी कशी आहे किंवा समोरच्या संघाने किती धावा केल्या आहेत याचा त्याला फरक पडत नाही. फिरकी असो किंवा जलद गोलंदाज…दोघांविरोधात त्याची खेळी उत्तम आहे. त्याला खेळताना पाहून मीदेखील आनंद लुटत होतो. जणू काही सेहवागलाच डाव्या हाताने खेळताना पाहत होतो”.

जर रुट आठ धावांमध्ये पाच विकेट घेतो, तर मी अश्विन-अक्षरचं कौतुक का करु?; इंझमामची ICC कडे कारवाईची मागणी

“मी सेहवागसोबत खेळलो आहे आणि त्यालादेखील इतर गोष्टींचा फरक पडत नव्हता. जेव्हा तो फलंदाजी करायचा तेव्हा खेळपट्टी कशी आहे किंवा समोरची गोलंदाजी कोणत्या पद्धतीची आहे याचा त्याला फरक पडत नव्हता. तो आपले शॉट खेळायचा. सेहवागनंतर मी पहिल्यांदाच असा खेळाडू पाहिला आहे ज्याला इतर गोष्टींचा काही फरक पडत नाही,” असं इंझमामने म्हटलं आहे.

“पंत फक्त भारतातच खेळतोय असं नाही तर त्याने ऑस्ट्रेलियातही चांगली खेळी केली. तो आपल्या वेगाने खेळतो त्यामुळे जास्त शतकं करु शकला नाही. बऱ्याच दिवसांनी मी असा खेळाडू पाहिला आहे. भारताकडे सचिन, द्रविड होता…आता विराट आणि रोहित आहे. पण ज्या पद्धतीने तो खेळतो ते जबरदस्त आहे. ज्या पद्धतीचा आत्मविश्वास त्याच्यात आहे, मी असा खेळाडू क्रिकेटमध्ये पाहिलेला नाही,” असंही यावेळी त्याने म्हटलं.