News Flash

निवड समिती प्रमुख पदावरून इन्झमाम पायउतार

इन्झमाम यांचा निवड समिती प्रमुखपदाचा कार्यकाळ ३१ जुलै रोजी संपणार आहे.

| July 18, 2019 02:16 am

निवड समिती प्रमुख पदावरून इन्झमाम पायउतार
photo credtit :(PCB Twitter Photo)

कराची : माजी क्रिकेटपटू इन्झमाम उल हकने बुधवारी पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) निवड समिती प्रमुख पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. परंतु नव्या भूमिकेसाठी आपण तयार असल्याचेही त्याने सांगितले.इन्झमाम यांचा निवड समिती प्रमुखपदाचा कार्यकाळ ३१ जुलै रोजी संपणार आहे. २०१६मध्ये इन्झमाम यांनी हे पद स्विकारले होते.

‘‘जवळपास तीन वर्ष पाकिस्तान क्रिकेट मंडळासाठी योगदान दिल्यानंतर आता थांबण्याची वेळ आली असून मी ‘पीसीबी’चे अध्यक्ष एहसान मणी यांना माझी मुदत न वाढवण्याची विनंती केली आहे. मात्र मी अन्य प्रशिक्षक, समालोचक यांसारख्या अन्य भूमिकांसाठी तयार आहे,’’ असे इन्झमाम म्हणाला. इन्झमाम यांच्या कार्यकाळात पाकिस्तानने २०१७चा चॅम्पियन्स करंडक उंचावला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2019 1:01 am

Web Title: inzamam ul haq to step down as pakistan chief selector zws 70
Next Stories
1 ऑलिम्पिक पात्रता तिरंदाजी स्पर्धा : दीपिका कुमारीचा ‘रौप्य’वेध!
2 प्रो कबड्डी लीग : फझल अत्राचली यू मुंबाचा कर्णधार
3 भारत ‘अ’ संघाची मालिकेत विजयी आघाडी
Just Now!
X