04 December 2020

News Flash

आयओएला आयओसीकडून निवडणुकीसाठी मुदत

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करीत नव्याने निवडणुका घेण्यासाठी व व्यवहार पारदर्शी ठरवून क्रीडा क्षेत्र स्वच्छ ठेवण्यासाठी

| September 7, 2013 02:53 am

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करीत नव्याने निवडणुका घेण्यासाठी व व्यवहार पारदर्शी ठरवून क्रीडा क्षेत्र स्वच्छ ठेवण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक महासंघाला (आयओए) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) ३१ ऑक्टोबपर्यंत मुदत दिली आहे.
आयओएने नुकत्याच झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीचे इतिवृत्त आयओसीकडे पाठविले होते. त्याबाबत आयओसीचे सरसंचालक ख्रिस्तोफर डी केपर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्यांनी आयओएला पत्र पाठविले आहे. आयओएने भ्रष्टाचारी पदाधिकाऱ्यांची व सदस्यांची हकालपट्टी करावी. तसेच या पदाधिकाऱ्यांच्या जागी कोणतेही आरोप नसलेले पदाधिकारी नियुक्त करावेत, असे या पत्रात कळविण्यात आले आहे.
आरोप ठेवण्यात आलेल्या व्यक्ती व आरोप सिद्ध होऊन दोषी ठरलेल्या व्यक्ती यामधील फरकाबाबत आयओसीला व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळेच आरोपी असलेल्या व्यक्तींचा आयओएमध्ये समावेश करू नये असेच आम्ही आयओएला कळविले आहे. जोपर्यंत न्यायालयात आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती दोषी ठरत नाही याची आयओसीला पूर्ण कल्पना आहे. ऑलिम्पिक चळवळीची प्रतिमा डागाळली जाऊ नये अशीच आमची इच्छा आहे. हे लक्षात घेऊनच आयओएने पुढील कार्यवाही करावी, असेही आयओसीच्या पत्रात म्हटले आहे.
बंदी घातलेल्या आयओएची विशेष सर्वसाधारण सभा ३१ ऑक्टोबरपूर्वी आयोजित केली जावी व आयओसीने सुचविलेल्या सुधारणांची अंमलबजावणी करावी, असा आदेश आयओएला देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 2:53 am

Web Title: ioc refuses to lift ioa suspension gives october 31 deadline
Next Stories
1 आयओसीचा गैरसमज दूर करण्याची गरज – उषा
2 ‘शक्ति’मान!
3 सानिया-झेंग पराभूत
Just Now!
X