05 March 2021

News Flash

IPL 2017 : ड्वेन ब्राव्होची ‘क्यूट फ्रेंड’ अनुषा दांडेकर

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ड्वेन ब्राव्होची आयपीएलमधील कामगिरी लक्षवेधी राहिली आहे

ड्वेन आयपीएलसाठी भारतात दाखल झाला असला तरी मांडीच्या दुखापतीमुळे तो सुरूवातीचा एक आठवडा सामन्यांना मुकणार आहे.

गुजरात लायन्स संघाचा आयपीएलच्या यंदाच्या पर्वात श्रीगणेशा अद्याप झालेला नाही. पण संघ विजयी सुरूवात करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. शुक्रवारी गुजरातचा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत होणार आहे. आपल्या पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू खूप उत्सुक आहेत.

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ड्वेन ब्राव्होची आयपीएलमधील कामगिरी लक्षवेधी राहिली आहे. ड्वेन आयपीएलसाठी भारतात दाखल झाला असला तरी मांडीच्या दुखापतीमुळे तो सुरूवातीचा एक आठवडा सामन्यांना मुकणार आहे. ऑस्ट्रेलियात खेळविण्यात आलेल्या बिग बॅश लीगमध्ये ब्राव्होला दुखापत झाली होती. ब्राव्होच्या दुखापतीवर सध्या उपचार सुरू असून तो पुढच्या आठवड्यात संघात दाखल होईल असा अंदाज आहे. दरम्यान, ब्राव्हो दुखापतीमुळे सरावापासूनही दूर आहे. त्यामुळे ब्राव्हो सध्या भारतात आपल्या मित्रमंडळींसोबत वेळ व्यतित करत आहे. नुकतेच ब्राव्होने सुत्रसंचालक अनुषा दांडेकरसोबतचा सेल्फी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. ब्राव्होने अनुषा दांडेकरचा उल्लेख ‘क्यूट फ्रेंड’ असा केला आहे. अनुषा दांडेकर हिने ब्राव्होची मुलाखत घेतली. मुलाखतीनंतर ब्राव्होने तिच्यासोबतचा एक सेल्फी इंस्टावर पोस्ट केला. अनुषा दांडेकर ही एमटीव्ही या टेलिव्हिजन वाहिनीवर सुत्रसंचालक म्हणून काम करते.

ड्वेन ब्राव्हो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन, चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळला आहे. चेन्नई सुपरकिंग्जच्या यशात ब्राव्होची भुमिका खूप महत्त्वाची राहिली आहे. मागील पर्वात ब्राव्होला गुजरात लायन्स संघाने आपल्या ताफ्यात दाखल केले. पण ब्राव्होकडून अपेक्षित कामगिरी मागील पर्वात पाहायला मिळाली नाही. त्यामुळे यंदाच्या पर्वात ब्राव्हो कमबॅक करणार का? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Interview with my cute friend @vjanusha

A post shared by Dwayne Bravo (@djbravo47) on

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 4:20 pm

Web Title: ipl 2017 dwayne bravo shares picture with anusha dandekar on instagram
Next Stories
1 मिसबाह-उल-हकची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2 युवा वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या लालरिंन्नुन्गाला रौप्य पदक
3 रोहितच्या कामगिरीबाबत उत्सुकता
Just Now!
X