पुणे सुपरजायंट्स विरूध्द सनरायझर्स हैदराबाद मॅचमध्ये पुण्याने ६ विकेट राखून विजय मिळवला आहे. पुण्यासमोर एकूण १७७ धावांचं आव्हान होतं. पुण्याच्या विकेट्स पडत गेल्याने त्यांची स्थिती डळमळीत झाली होती पण धोनीने त्याची कमाल पुन्हा दाखवली. मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये उत्कंठावर्धक स्थिती निर्माण झाली. त्याआधी धोनीची दमदार फटकेबाजी चालू होती. त्याने झळकावलेल्या हाफ सेंच्युरीमुळे विजय पुण्याच्या दृष्टिपथात आला. एकावेळी १२ बाॅल्समध्ये ३० हव्या असताना शेवटच्या ओव्हरमध्ये परिस्थिती पुण्याच्या ताब्यात आली. आज पुण्याच्या चार विकेट्स गेल्या आहेत. अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स आणि त्रिपाठी पॅव्हेलियनमध्ये परतले. रशीद खानच्या डायरेक्ट हिटमुळे त्रिपाठीला हात हलवत पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. स्टीव्ह स्मिथची विकेट दुर्दैवीच म्हणावी लागेल. त्याच्या बॅट आणि पॅड्सना बाॅल लागून मग तो स्टंप्सवर आदळला. याआधी हैदराबादच्या बॅटिंगच्या वेळी त्यांची सुरूवात तर चांगली झाली. त्यांचे ओपनिंगचे शिलेदार शिखर धवन आणि डेव्हिड वाॅर्नरने धावफलक चांगला हलता ठेवला. याआधीच्या मॅचमध्ये या दोघांनी चांगली सुरूवात करून दिली होती, पण आज सनरायझर्स ५५ रन्सवर असताना शिखर धवन तंबूत परतला. त्यानंतर केन विल्यमसन आणि डेव्हिड वाॅर्नर आऊट झाल्याने हैदराबादची अवस्था १२९-३ अशी झाली होती. पण त्यानंतर क्रीझवर आलेल्या हेन्रिकेसने तुफान फटकेबाजी करत सनरायझर्सना तीन विकेट्सच्या मोबदल्यात १७६ रन्सची चांगली मजल मारून दिली.

यंदा पुण्याची  बाॅलिंग म्हणावी तशी चांगली झालेली नाही. यंदा अशोक डिंडाला भरपूर मार पडलाय. इमरान ताहिरने मात्र आपली कामगिरी चांगली ठेवली आहे.

सामनावीर- महेंद्रसिंग धोनी</strong>

LIVE UPDATES

७:३०- पुण्याचा हैदराबादवर ६ विकेट्स राखून विजय

७:२९: मॅच उत्कंठावर्धक स्थितीत

७:१६- धोनीची फटकेबाजी सुरूच, पुण्याला १२ बाॅल्समध्ये ३० रन्सची गरज

६:५६- धोनीचा दमदार सिक्सर

६:५३- रशीद खानच्या डायरेक्ट हिटमुळे त्रिपाठी रनआऊट, पुणे ९८-३

६:४०- पुण्याच्या दोन विकेट्स, स्टीव्ह स्मिथचा बॅटला बाॅल लागून त्रिफळा, पुणे ८७-२

५:५९: अजिंक्य रहाणे तंबूत परत, पुण्याची पहिली विकेट

५:५२- पुण्याची इनिंग सुरू

५:३४- पुण्यासमोर १७७ रन्सचं आव्हान

५:३१- मोझेस हेन्रिकेसची हाफ सेंच्युरी

५:१९- विचित्र फटका मारायच्या नादात डेव्हिड वाॅर्नर त्रिफळाचीत. हैदराबाद १२९-३

५:१७- हेन्रिकेसचा तुफान सिक्सर, हैदराबाद १२८-२

५:१२- दुसरा स्ट्रॅटेजिक टाईमआऊट

४:५१- केन विल्यमसन माघारी, हैदराबाद , ८४-२

४:३८- सनरायझर्सना पहिला झटका, शिखर धवन पॅव्हेलियनमध्ये, ५५-१

४:३०- पहिला स्ट्रॅटेजिक टाईमआऊट

४:२५- शिखर धवनची चांगली फटकेबाजी

३:३४- पुण्याने टाॅस जिंकला, पहिली बाॅलिंग करायचा निर्णय