आज राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये झालेल्या मुकाबल्याचा निर्णय कोलकात्याच्या बाजूने लागला. कोलकात्याने सहा विकेट राखत राॅयल चॅलेंजर्सना नमवलं. राॅयल चॅलेंजर्सची या आयपीएल मधली कामगिरी चांगली झालेली नाही. राॅयल चॅलेंजर्सची बॅटिंग ही त्यांची कमजोर बाजू आहे. या सीरिजमध्ये त्यांची बॅटिंग चार वेळा गडगडली आहे. आजही मॅचच्या पहिल्या बाॅलला बंगळुरूचा ख्रिस गेल झेलबाद होत पॅव्हेलियनमध्ये परतला. सुरूवातीच्या काही विकेटनंतर मात्र ट्रॅव्हिस आणि मनदीप सिंगची जोडी चांगली जमली. त्यांनी चांगली भागिदारी करून देत बंगळुरूचा डाव सावरला. या स्पर्धेत बंगळुरूची बॅटिंग अनेक वेळा गडगडली आहे. आज त्यांच्या बाबतीत असं काही  झालं नाही खरं, ही एवढीच त्यांच्या जमेची बाजू म्हणावी लागेल.

एकाच आठवड्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स गुणतालिकेमध्ये. पहिल्या स्थानावर होते. पण हैदराबाद आणि पुण्याविरूध्द झालेल्या पराभवामुळे कोलकाता ‘टाॅप टू’ मधून खाली आले.

कोलकाता नाईट रायडर्सच्या इनिंगची सुरूवातच चांगल्या प्रकारे झाली. त्यांच्या सलामीवीरांनी त्यांच्या इनिंगचा जबरदस्त पाया घालून दिला. ख्रिस लिन आणि सुनील नरीनने चौफेर फटकेबाजी करत ओपनिंगलाच चांगला जम बसवला. या दोघांनीही हाफ सेंच्युरी केली. ख्रिस लिनने ५० रन्स केले तर सुनील नरीनने ५४ रन्स  केले. हे दोघे माघारी आल्यावरही त्यांनी केलेल्या रन्सच्या जोरावर कोलकात्याच्या बाकी बॅट्समननी चांगली बॅटिंग करत धावफलक हलता ठेवला आणि १६ वी ओव्हर सुरू असताना ६ विकेट राखून बंगळुरूला हरवलं