News Flash

IPL 2017 Player Auction: पवन नेगीचा भाव घसरला, साडेआठ कोटींवरून थेट १ कोटींची बोली

आरसीबी संघाने ६० लाख रुपयांची बोली लावत लिलाव पुढे नेला

पवन नेगी

इंडियन प्रिमीअर लीग क्रिकेट सामने म्हणजे क्रिडाप्रेमी आणि खेळाडूंसाठी एक प्रकारची पर्वणीच असते. लाख आणि कोटींच्या घरात विविध खेळाडूंवर बोली लावत प्रत्येक संघमालक चांगल्या खेळाडूची निवड करण्यास प्राधान्य देत असल्याचे पाहायला मिळते. पण, यंदाच्या वर्षी आयपीएल लिलावादरम्यान भारतीय क्रिकेट संघातील पवन नेगी या खेळाडूच्या दरात लक्षणीय घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. साडेआठ कोटींवरुन पवनचा भाव घसरुन त्याच्यावर फक्ट एक कोटीची बोली लावत आरसीबी संघाने त्याला चमूत घेतले आहे. मागील वर्षी भारतीय क्रिकेट संघातील पवन नेगीवर सर्वाधिक म्हणजेच साडेआठ कोटींची बोली लावण्यात आली होती. पण, नवव्या पर्वात प्रकाशझोतात आलेल्या नेगीला त्याचा फॉर्म टिकवता आला नसल्यामुळे यंदाच्या आयपीएल २०१७ च्या लिलाव प्रक्रियेदरम्यान त्याच्या दरात घसरण झाल्याचे म्हटले जात आहे.

पवन नेगीच्या दरात तब्बल साडेसात कोटींची घसरण झाली असून ही बाब सध्या अनेकांचेच लक्ष वेधत आहे. पण, पवनचा खराब फॉर्मच याला जबाबदार असल्याचेही म्हटले जात आहे. आयपीएलच्या मागील पर्वात आठ सामन्यांमध्ये पवनने अवघ्या ५७ धावा केल्या होत्या. ज्यांमध्ये १९ धावांची खेळी ही त्याची सर्वाधिक धावांची खेळी ठरली होती. गोलंदाजीच्या बाबतीतही त्याला यश मिळाले नसून ९ षटकांमध्ये त्याने अवघा एक गडी बाद करत ८४ धावा विरोधी संघाला देऊ केल्या होत्या. रणजी सामन्यांमध्ये आणि आयपीएल चषकामध्ये दिल्ली संघाकडून खेळणाऱ्या नेगीला त्याचा फॉर्म टिकवण्यात अपयश आल्यामुळेच आज तो पिछाडीवर आहे असे म्हणावे लागेल.

क्रिकेट विश्वात पदार्पणानंतर सुरुवातीचे काही दिवस प्रभावी खेळी करत पवन नेगीने अनेकांचेच लक्ष वेधले होते. पण, काही दिवसांपासून सुरु असलेला त्याचा खराब फॉर्म पाहता आयपीएल लिलावातही त्याचेच पडसाद उमटल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवारी सुरु झालेल्या आयपीएल लिलावामध्ये भारतीय संघातील ऑल राऊंडर पवन नेगीवर सर्वप्रथम ३० लाख रुपयांची बोली लावण्यात आली. त्यानंतर काही संघमालकांनी पवनची निवड करण्यात स्वारस्य दाखवले. गुजरात लायन्सने ५५ लाखांची बोली लावत हा लिलाव पुढे नेला. पवन नेगी या रकमेवर गुजरातच्या संघासाठी निवडला जाणार इतक्यातच आरसीबीच्या संघाने ६० लाख रुपयांची बोली लावत लिलाव पुढे नेला. सरतेशेवटी या लिलावप्रक्रियेत आरसीबीने बाजी मारत एक कोटी रुपयांना पवन नेगीला संघात दाखल करुन घेतले आहे.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात एकिकडे आरसीबीने टायमल मिल्ससारख्या खेळाडूची घसघशीत रक्कम देऊन निवड केली आहे. त्याच ठिकाणी भाव घसरलेल्या पवन नेगीलाही या संघात जागा मिळाली आहे. त्यामुळे आता यंदाच्या आयपीएलमध्ये नेगी पुन्हा एकदा फॉर्ममध्ये येणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. नेगीच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये त्याने इतर कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांच्या तुलनेत टी२० सामने जास्त खेळले असल्यामुळे ही त्याची जमेची बाजू ठरु शकते. पण, लिलावात घसरलेल्या दराचे ओझे आणि फॉर्ममध्ये परत येण्याचे दडपण या सर्वाचा पवनच्या खेळीवर काय परिणाम होणार हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2017 2:11 pm

Web Title: ipl 2017 player auction from rs 8 5 crore to rs 1 crore pawan negis stock falls dramatically in a year
Next Stories
1 IPL 2017 Player Auction : अफगाणिस्तानच्या रशीद खानला लॉटरी, पदार्पणातच ४ कोटींची बोली
2 IPL 2017 Player Auction: कोण आहे कोट्यधीश टायमल मिल्स?
3 IPL Auction 2017 Sold & Unsold Players: आयपीएल लिलावात विकले गेलेले आणि न विकले गेलेले खेळाडू कोणते?
Just Now!
X