12 December 2017

News Flash

IPL 2017 : पी.व्ही.सिंधू आयपीएलच्या मैदानात

सिंधूने सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजीचा आनंद लुटला

लोकसत्ता ऑनलाईन | Updated: April 19, 2017 10:21 PM

भारताला बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक रौप्यपदक जिंकून देणारी पी.व्ही.सिंधू (संग्रहित छायाचित्र)

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स असा सामना सुरू आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्त्वाखालील हैदराबादच्या संघाने प्रथम फलंदाजी करत दिल्लीसमोर १९२ धावांचे आव्हान उभारले. हैदराबादकडून यावेळी केन विल्यमसन आणि शिखर धवन यांनी १३६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली. विल्यमसन, धवनच्या प्रत्येक चौकार आणि षटकारावर स्टेडियमवर चाहत्यांचा जल्लोष सुरू होता. हैदराबादच्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी आज प्रेक्षकांमध्ये एक खास स्टार प्रेक्षक देखील उपस्थित होता.

भारताला बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक रौप्यपदक जिंकून देणारी पी.व्ही.सिंधू प्रेक्षक म्हणून उपस्थित होती. सनरायझर्स हैदराबाद संघाची जर्सी परिधान केलेल्या सिंधूने पॅव्हेलियनमधून सनरायझर्सच्या फलंदाजीचा आनंद लुटला.

सिंधूला काही दिवसांपूर्वी सिंगापूर ओपन सुपर सीरिजमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिने सिंधूला पराभूत केले. तत्पूर्वी, सिंधूने इंडियन ओपन सुपर सीरिजमध्ये मारिन हिला अंतिम फेरीत धूळ चारून स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले होते.

First Published on April 19, 2017 10:21 pm

Web Title: ipl 2017 pv sindhu cheers for sunrisers hyderabad