News Flash

IPL 2018 – अकराव्या हंगामाची तारीख ठरली, सामन्यांच्या वेळातही बदल

७ एप्रिल ते २७ मे दरम्यान रंगणार स्पर्धा

आयपीएलच्या दहाव्या हंगामाचं विजेतेपद पटकावणारा मुंबई इंडियन्सचा संघ

आयपीएलची पहिली १० पर्व यशस्वीपणे पार पडल्यानंतर, अकराव्या हंगामासाठीचा लिलाव काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. या लिलावात कोणता संघ कोणत्या खेळाडूला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेणार याची उत्सुकता असतानाच, अकराव्या हंगामाची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. ७ एप्रिल ते २७ मे या कालावधीत आयपीएलचा अकरावा हंगाम खेळवला जाणार आहे. यंदाच्या हंगामात सलामीच्या आणि अंतिम सामन्याचा मान मुंबईला देण्यात आलेला आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी यासंदर्भात माहिती दिली.

अकराव्या हंगामत आयपीएल सामन्यांच्या वेळात बदल करण्यात आलेली आहे. यंदाच्या हंगामात आयपीएल सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क स्टार स्पोर्ट्स या वाहिनीकडे देण्यात आलेले आहेत. वाहिनीने केलेल्या विनंतीवरुन संध्याकाळच्या सामन्यांची वेळ ही ५ वाजून ३० मिनीटांनी तर रात्रीच्या सामन्यांची वेळ ७ वाजता करण्यात आलेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2018 10:23 pm

Web Title: ipl 2018 ipl governing council announced date for the new season also change in timing of the match
टॅग : IPL 2018
Next Stories
1 IPL 2018 – चेन्नई सुपर किंग्जच्या प्रशिक्षकपदी स्टिफन फ्लेमिंग
2 IPL 2018 – मायकल हसी चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाजी प्रशिक्षक
3 IPL 2018 Retetion : चेन्नईच्या संघात धोनीची वापसी; केकेआरमधून गंभीर बाहेर
Just Now!
X