02 April 2020

News Flash

IPl 2018 – डेव्हिड वॉर्नरचा उत्तराधिकारी ठरला, न्यूझीलंडचा केन विलियमसन हैदराबादचा कर्णधार

संघ व्यवस्थापनाकडून घोषणा

केन विलियमसन सनराईजर्स हैदराबाद संघाचा नवीन कर्णधार.

बॉल टॅम्परिंग प्रकरणात, एक वर्षाच्या बंदीची शिक्षा भोगत असलेल्या डेव्हिड वॉर्नरने सनराईजर्स हैदराबाद संघाच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला होता. या जागेवर आता न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन याची वर्णी लागलेली आहे. सनराईजर्स हैदराबाद संघाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन विलियमसनच्या नेमणुकीबद्दल माहिती दिली.

इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेदरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विलियमसनने डेव्हिड वॉर्नरची पाठराखण केली होती. वॉर्नरकडून चुक झाली असली तरीही तो वाईट माणून नाही असं म्हणत विलियमसनने वॉर्नरला आपला पाठींबा दर्शवला. वॉर्नरच्या अनुपस्थितीत शिखर धवनकडे सनराईजर्स हैदराबाद संघाचं नेतृत्व जाणार अशी चर्चा होती. मात्र सनराईजर्स हैदराबाद प्रशासनाने न्यूझीलंडच्या केन विलियमसनवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.

अवश्य वाचा – वॉर्नरकडून चूक झाली पण तो वाईट माणूस नाही – केन विलियमसन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2018 1:46 pm

Web Title: ipl 2018 kane williamson appointed srh captain in absence of david warner
Next Stories
1 IPL 2018 – राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदावरुन स्टिव्ह स्मिथ बडतर्फ? चेंडू कुरतडल्याचे प्रकरण भोवण्याची शक्यता
2 IPL 2018 – विराटच्या रॉयल चँलेजर्सला धक्का, महत्वाचा खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर
3 IPL 2018 – मुंबई इंडियन्सच्या गोटात ‘या’ खेळाडूचं पुनरागमन
Just Now!
X