आगामी आयपीएल हंगामासाठी भारताचे माजी जलदगती गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांना किंग्ज इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आलेलं आहे. काही दिवसांपूर्वी प्रसाद यांनी १९ वर्षाखालील निवड समितीच्या प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. आज किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघ व्यवस्थापनाने संघाच्या इतर प्रशिक्षकांची नावंही जाहीर केली आहेत.

व्यंकटेश प्रसाद यांच्याव्यतिरीक्त ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज ब्रॅड हॉज आगामी ३ वर्षांसाठी किंग्ज पंजाबचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. विरेंद्र सेहवाग हा किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा मार्गदर्शक म्हणून काम पाहतो आहे. याचसोबत दिल्लीचा माजी खेळाडू मिथुन मन्हास किंग्ज इलेव्हन पंजाबचा सहायक प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2018 – दिनेश कार्तिक कोलकाता नाईट रायडर्सचा नवीन कर्णधार

व्यंकटेश प्रसादच्या येण्याने किंग्ज इलेव्हन पंजाबमधील खेळाडूंना फायदा होणार असल्याचं विरेंद्र सेहवागने म्हटलं आहे. अकराव्या हंगामासाठी रविचंद्रन आश्विनची पंजाबच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे अकराव्या हंगामात पंजाबचा संघ कशी कामगिरी करतो हे पहावं लागणार आहे.

अवश्य वाचा – माजी फिरकीपटू आशिष कपूर १९ वर्षाखालील संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष बनण्याचे संकेत