03 April 2020

News Flash

IPL 2018 – कोलकाता नाईट रायडर्सला धक्का, दुखापतीमुळे मिचेल स्टार्क आयपीएलला मुकणार

स्टार्कच्या उजव्या पायाला दुखापत

मिचेल स्टार्क (संग्रहीत छायाचित्र)

आयपीएलचा अकरावा हंगाम सुरु होण्यासाठी अवघा आठवडाभराचा कालावधी शिल्लक असताना, कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा धक्का बसला आहे. कोलकात्याच्या गोलंदाजीचं प्रमुख अस्त्र मानलं जाणाऱ्या मिचेल स्टार्कला उजव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागणार असल्याचं समजतंय. मिचेल स्टार्कवर कोलकाता नाईट रायडर्सने अकराव्या हंगामासाठी तब्बल ९.४ कोटींची बोली लावली होती.

अवश्य वाचा – IPL 2018 – राजस्थान रॉयल्स संघात ‘हा’ खेळाडू घेणार स्टीव्ह स्मिथची जागा

मिचेल स्टार्कच्या उजव्या पायाच्या हाडाला दुखापत झाल्याचं समजतंय. पुढील उपचारासाठी स्टार्क मायदेशी परतणार असल्याचं कळतंय. अकराव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध होणार आहे. त्यामुळे मिचेल स्टार्कच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी दिली जाते हे पहावं लागणार आहे.

अवश्य वाचा – चेन्नई सुपरकिंग्ज बद्दल बोलताना महेंद्रसिंह धोनी का झाला भावुक?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2018 2:00 pm

Web Title: ipl 2018 mitchell starc to miss ipl due to right leg injury
Next Stories
1 IPL 2018 – राजस्थान रॉयल्स संघात ‘हा’ खेळाडू घेणार स्टीव्ह स्मिथची जागा
2 IPL 2018 – डेव्हिड वॉर्नरला पर्याय मिळाला, सनराईजर्स हैदराबाद श्रीलंकेच्या ‘या’ खेळाडूला संघात घेण्याच्या तयारीत
3 IPl 2018 – डेव्हिड वॉर्नरचा उत्तराधिकारी ठरला, न्यूझीलंडचा केन विलियमसन हैदराबादचा कर्णधार
Just Now!
X