03 April 2020

News Flash

IPL 2018 – मुंबईकर अमोल मुझुमदार राजस्थान रॉयल्सचा फलंदाजी प्रशिक्षक

अमोलकडे प्रथमश्रेणी क्रिकेटचा मोठा अनुभव

अमोल मुझुमदार (संग्रहीत छायाचित्र)

दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगून आल्यानंतर, राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या अकराव्या हंगामासाठी जय्यत तयारी केल्याचं दिसतंय. आगामी हंगामासाठी राजस्थान रॉयल्सने मुंबईचा माजी रणजीपटू अमोल मुझुमदारला फलंदाजी प्रशिक्षकपदी नेमलं आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन राजस्थान संघ व्यवस्थापनाने या नेमणुकीची घोषणा केली आहे.

रणजी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अमोल मुझुमदारच्या पदरी दांडगा अनुभव आहे. १७१ प्रथम श्रेणी सामन्यांमघ्ये अमोलने ११ हजार १६७ धावा केल्या आहेत. आपल्या काळात अमोल तंत्रशुद्ध फलंदाजी आणि ‘खडुस’ खेळीसाठी ओळखला जायचा. संघातील तरुण फलंदाजांना अमोलच्या अनुभवाचा फायदा होणार आहे. त्यामुळे या हंगामात नवीन सुरुवात करताना आम्ही अमोलवर मोठी जबाबदारी सोपवल्याचं, राजस्थान रॉयल्सच्या संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केलं.

आजपासून राजस्थान रॉयल्स, आपल्या खेळाडूंसाठी जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानावर सराव शिबीर सुरु करणार आहे. या शिबीरात अमोल राजस्थानच्या युवा फलंदाजांना मार्गदर्शन करणार आहे. काळानुरुप क्रिकेटमध्ये अमुलाग्र बदल झालेले आहेत. सध्याची तरुण पिढी हे नवीन बदल अतिशय वेगाने आत्मसात करत आहे, त्यामुळे त्यांच्या जोडीने काम करताना आपल्यालाही अनेक गोष्टी शिकायला मिळणार असल्याचं अमोल मुझुमदार म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2018 5:40 pm

Web Title: ipl 2018 rajasthan royals appoints amol muzumdar as a batting coach
Next Stories
1 ये देश हे शेर जवानोंका….,आयपीएलच्या अकराव्या हंगामाचं अँथम ऐकलत का?
2 IPL 2018 – हिथ स्ट्रिक कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाजी प्रशिक्षक
3 IPL 2018: उगवत्या सूर्याची झळाळी आणि बरंच काही, दिल्ली डेअरडेविल्सची नवी जर्सी पाहिली का?
Just Now!
X