बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला, आयपीएलमधघ्ये सनराईजर्स हैदराबाद संघाच्या कर्णधारपदावरुनही पायउतार व्हावं लागलं. त्यामुळे वॉर्नरची संघातली जागा नेमकं कोण घेणार यावरुन अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सनराईजर्स हैदराबाद संघाचं प्रशासन श्रीलंकेचा फलंदाज कुशल परेराला संघात समाविष्ट करुन घेणार असल्याचं समजतं आहे.

अवश्य वाचा – IPl 2018 – डेव्हिड वॉर्नरचा उत्तराधिकारी ठरला, न्यूझीलंडचा केन विलियमसन हैदराबादचा कर्णधार

“वॉर्नरने दिलेल्या राजीनाम्यानंतर आम्ही कुशल परेराला संघात येण्याबद्दल विचारलं आहे. वॉर्नरप्रमाणे परेराही स्फोटक फलंदाज आहे. गेल्या काही सामन्यांमधला त्याची कामगिरी ही वाखणण्याजोगी आहे. अद्यापही याबाबत कोणताही अधिकृत करार करण्यात आलेला नाहीये. मात्र येत्या काळात परेरा संघात दाखल होईल अशी आम्हाला आशा आहे.” Cricket Age या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सनराईजर्स हैदराबाद संघाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली.

अवश्य वाचा – बॉल टॅम्परिंग प्रकरणात डेव्हिड वॉर्नरकडून चूक मान्य, ट्विटरवरुन चाहत्यांसाठी जाहीर केला माफीनामा

७ एप्रिलपासून आयपीएलच्या अकराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्याने अकराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. सनराईजर्स हैदराबाद संघाचा पहिला सामना ९ एप्रिलरोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे. त्यामुळे वॉर्नच्या अनुपस्थितीत परेरा हैदराबाद संघात दाखल होतो की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – वॉर्नरकडून चूक झाली पण तो वाईट माणूस नाही – केन विलियमसन