आयपीएलच्या बाराव्या हंगामात, बाद फेरीच्या सामन्यांमध्ये महत्वाचा बदल करण्यात आला आहे. रात्री आठ वाजता सुरु होणारे सामने आता साडे सात वाजता सुरु होणार आहे. ८ वाजता सुरु होणाऱ्या सामन्यांची नाणेफेक ही साडेसात वाजता व्हायची. मात्र बाद फेरीच्या सामन्यांमध्ये ही नाणेफेक सात वाजता होईल.

अवश्य वाचा – IPL 2019 : ऋषभ पंतचा मोठा विक्रम, कुमार संगकाराला टाकलं मागे

“सामन्यांचं प्रसारण करणाऱ्या वाहिनीशी आमची चर्चा झाली असून, प्ले-ऑफचे सामने ८ ऐवजी साडे-सात वाजता सुरु होतील.” क्रिकेट प्रशासकीय समितीच्या सदस्याने पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली. २०१८ सालीही प्ले-ऑफचे सामने ८ ऐवजी सात वाजता खेळवण्यात आले होते.

आयपीएलच्या बाराव्या हंगामातले अनेक सामने हे रात्री बारानंतरही सुरु असतात. अनेक समालोचक आणि खेळाडूंनी याबद्दल आपली नाराजी बोलून दाखवली होती. सामन्यांच्या या व्यस्त वेळापत्रकाचा खेळाडूंच्या तब्येतीवर परिणाम होण्याची शक्यता अनेक माजी खेळाडूंनी बोलून दाखवली होती. त्यावरुन बीसीसीआयने आयपीएलच्या सामन्यांमध्ये महत्वाचा बदल केला आहे.

अवश्य वाचा – IPL 2019 : मुंबईने सामना गमावला, कर्णधार रोहितला दंड