News Flash

IPL 2019 : मुंबई इंडियन्सला मिळाला नवीन भिडू, अल्झारी जोसेफला संघात स्थान

मिलनेच्या जागी जोसेफला संघात स्थान

आयपीएलच्या बाराव्या हंगामात मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. घरच्या मैदानावर खेळत असताना दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध मुंबईला पराभव स्विकारावा लागला. त्यातच पहिल्या सामन्याआधी न्यूझीलंडचा अडम मिलने दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर गेला. त्यामुळे पहिल्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांना चांगलाच मार सहन करावा लागला. मिलनेच्या जागी मुंबई इंडियन्सने विंडीजच्या अल्झारी जोसेफला संघात स्थान दिलं आहे.

श्रीलंकेत होणाऱ्या स्थानिक वन-डे स्पर्धेसाठी लसिथ मलिंगा आयपीएलचे पहिले ६ सामने खेळू शकणार नव्हता. मात्र श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने परवानगी दिल्यामुळे मलिंगा आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होणार आहे. पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे मैदानावर उतरु शकला नाही. त्याच्या दुखापतीबद्दल संभ्रम असताना, बंगळुरुविरुद्ध सामन्यात मुंबईला पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरावं लागणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबईचा संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2019 2:32 pm

Web Title: ipl 2019 alzarri joseph replaces injured adam milne in mumbai indians squad
टॅग : IPL 2019
Next Stories
1 Pak vs Aus, 3rd ODI: ऑस्ट्रेलियाची ८० धावांनी पाकिस्तानवर मात; मालिकाही घातली खिशात
2 माझ्याच चारित्र्यावर संदेह वाटू लागला -राहुल
3 कोहली-बुमरा संघर्षांकडे लक्ष
Just Now!
X