News Flash

IPL 2019 : स्वतःला शाहरुख समजतोस का? जेव्हा मित्र लोकेश राहुलची खिल्ली उडवतात

स्मिथचा झेल पकडल्यानंतर राहुलने केलं सेलिब्रेशन

(संग्रहित छायाचित्र)

आयपीएलच्या बाराव्या हंगामाने आता प्रेक्षकांच्या मनावर आपली पकड घ्यायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात, रविचंद्रन आश्विनने बटलरला ‘मंकड’ पद्धतीने धावबाद करत नवीन वादाला तोंडही फोडलं. पहिल्याच सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने राजस्थानवर मात केली. या सामन्यात पंजाबच्या लोकेश राहुल स्टिव्ह स्मिथचा झेल पकडत सर्वांची वाहवा मिळवली. हा झेल पकडल्यानंतर राहुलने शाहरुख खानसारखं सेलिब्रेशनही केलं.

अवश्य वाचा – IPL 2019 : आश्विनच्या ‘त्या’ रनआऊटबद्दल राहुल द्रविड म्हणाला…

याबद्दल विचारलं असताना राहुल म्हणाला, “कसलं सेलिब्रेशन?? मला त्यावेळी काय करावं हे सूचत नव्हतं. माझ्या मित्रांनी यावरुन माझी खिल्लीही उडवली. काही जणांनी तर मला, स्वतःला शाहरुख समजतोस का असंही विचारलं??” लोकेश राहुल India Today वाहिनीशी बोलत होता.

पहिल्या सामन्यात पंजाबने आश्वासक कामगिरी करत राजस्थानवर मात केली आहे. गेल्या हंगामात चांगली सुरुवात करुनही पंजाबचा संघ बाद फेरीत प्रवेश करु शकला नव्हता. त्यामुळे यंदा या स्पर्धेत पंजाबचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – Video : चेन्नईच्या ड्रेसिंग रुममध्ये रंगलं केदार जाधवचं बर्थ-डे सेलिब्रेशन

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2019 5:18 pm

Web Title: ipl 2019 are you shah rukh khan or something kl rahul reveals how friends mocked him after celebration versus rr
टॅग : IPL 2019,Rr,Shahrukh Khan
Next Stories
1 क्रिकेटपटूंच्या मतदानासाठी अश्विनची बॅटिंग, मोदींना केली विनंती
2 IPL 2019 : आश्विनच्या ‘त्या’ रनआऊटबद्दल राहुल द्रविड म्हणाला…
3 तुफानी फलंदाजी करत मराठमोळ्या खेळाडूने लगावले सात चेंडूत सात षटकार
Just Now!
X