16 January 2021

News Flash

२०१९ मधील आयपीएलचा महासंग्राम भारताबाहेर?

बीसीसीआयने सामने भारताबाहेर हलवण्याचा निर्णय घेतला आहे. 

२०१९ मध्ये लोकसभा निवडणुका आणि आयपीएल सामने एकाचवेळी येणार असल्याने आयपीएलचे हे सत्र भारताबाहेर जाण्याची शक्यात आहे. २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीवेळी आयपीएलचे सामने द. आफ्रिका आणि युएईमध्ये खेळण्यात आले होते.  लोकसभा निवडणुका आणि आयपीएल सामने एकाचवेळी येणार असल्याने या सामन्यांना सुरक्षा पुरवण्यास केंद्र सरकारने असमर्थता दर्शवली आहे.  त्यामुळे बीसीसीआयने सामने भारताबाहेर हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या बीसीसीआयचे लक्ष निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होतात याकडे आहे. कारण त्यावरच २०१९च्या आयपीएलचे आयोजन केले जाणार आहे. येत्या ९ एप्रिल ते ३ जून दरम्यान आयपीएल सामने होणार असून, सार्वत्रिक निवडणुकाही मे महिन्याच्या मध्यापर्यंत संपतील. बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी यापूर्वीच आयपीएलचा एक टप्पा दक्षिण आफ्रिकेमध्ये होण्याची शक्यता वर्तवली होती. बीसीआयसमोर इतरही अनेक पर्याय असल्याचे पटेल यांनी म्हटले आहे.

२००९ आणि २०१४ मध्येही याआधी भारताबाहेर आयपीएलचे सामने झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेत २००९ मध्ये तर युएईत २०१४मध्ये आयपीएलचे सामने झाले होते. त्यामुळे २०१९चे देखील आयपीएल भारताबाहेर होण्याची शक्यता आहे. याच २ देशांमध्ये किंवा २ वेगवेगळ्या देशांमध्ये हे सामने होऊ खेळवले जावू शकता. इंग्लंडची ही चर्चा यामध्ये होत आहे. इंग्लंडमध्ये सामने ठेवल्यास ते अधिक खर्चीक होऊ शकतात. युएईमध्ये तीनच मैदाने असल्याने अधिक कल हा आफ्रिकेच्या बाजुने आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2018 12:04 pm

Web Title: ipl 2019 could move out of india bcci%e2%80%89has two venues in mind
Next Stories
1 युवराजने खरेदी केली BMWची अफलातून बाईक
2 ..तरीही भारत अव्वल स्थानी
3 अँडरसनची प्रतिस्पर्धी फलंदाजांवरील दहशत कायम राहावी – जो रूट
Just Now!
X