27 September 2020

News Flash

Video : सरावातून वेळ काढत धोनीने पूर्ण केली लहानग्यांची इच्छा

आयपीएलच्या पहिल्या सामन्यासाठी धोनीचा कसून सराव

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी

आयपीएलमध्ये संपूर्ण देशभरात चेन्नई सुपरकिंग्ज या संघाला प्रेक्षकांची पसंती मिळत असते. चेन्नईच्या संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा संपूर्ण देशवासियांच्या गळ्यातला ताईत बनलेला आहे. आयपीएलच्या सामन्यांसाठी धोनी ज्या शहरात जाईल तिकडे त्याला चाहत्यांच्या गराडा पडतो. बाराव्या हंगामाच्या सुरुवातीला धोनीचा चेन्नई आणि विराट कोहलीचा बंगळुरु संघ समोरासमोर उभे ठाकणार आहेत. या सामन्यासाठी धोनी सध्या कसून सराव करतोय. यावेळी धोनीने वेळात वेळ काढत, उपस्थित लहानग्या चाहत्यांची इच्छा पूर्ण केली.

आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी धोनीने पॅड बांधूनच थेट सीमारेषेजवळील बॅरिकेडवरुन उडी मारली. धोनीचं हे आगळं वेगळं रुप पाहून चाहत्यांच्या आनंदालाही पारावर उरला नाही. धोनीने उपस्थित चाहत्यांना सही देत त्यांची इच्छा पूर्ण केली. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघाने गतवर्षीच्या हंगामाचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे यंदा चेन्नईचा संघ काय कमाल करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2019 : पहिल्या सामन्यासाठी विराट-धोनी सज्ज, मैदानावर कसून सराव

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 7:39 pm

Web Title: ipl 2019 csk captain ms dhoni fulfill his fans demand watch here
टॅग Csk,IPL 2019,Ms Dhoni
Next Stories
1 १४२ वर्षांनी कसोटी क्रिकेटमध्ये बदल, खेळाडूंच्या पोशाखावर नाव आणि नंबर?
2 विश्वचषकासाठी मी योग्य उमेदवार – उमेश यादव
3 पाक मंत्र्यांचं नवीन रडगाणं, म्हणाले आयपीएलचे सामने दाखवणार नाही !
Just Now!
X