28 February 2020

News Flash

चेन्नई सुपरकिंग्ज पुन्हा विजयपथावर, पंजाबवर 22 धावांनी मात

चेन्नईचा बाराव्या हंगामातला चौथा विजय

आयपीएलच्या बाराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा रथ पुन्हा एकदा विजयपथावर लागला आहे. घरच्या मैदानावर खेळत असताना चेन्नईने पंजाबवर 22 धावांनी मात केली. 161 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला पंजाबचा संघ 138 धावांपर्यंतच मजल मारु शकला. चेन्नईचा या हंगामातला हा चौथा विजय ठरला आहे.

161 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबची सुरुवात खराब झाली. भरवशाचा ख्रिस गेल झटपट माघारी परतला. यानंतर मयांक अग्रवालही हरभजन सिंहच्या गोलंदाजीवर माघारी परतला. मात्र यानंतर लोकेश राहुल आणि सरफराज खान यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. या खेळीदरम्यान दोघांनीही आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र मोक्याच्या षटकांमध्ये धावगती वाढवणं त्यांना जमलं नाही.

याचाच परिणाम म्हणजे, अखेरच्या 4 षटकांमध्ये पंजाबसमोरचं आव्हान वाढलं. त्यातचं चेन्नईच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत टिच्चून मारा करत पंजाबच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. लोकेश राहुल मोठा फटका खेळण्याच्या नादात माघारी परतला. 19 व्या षटकात दिपक चहरने सुरुवातीच्या दोन चेंडूवर स्वैर मारा करत चिंतेचं वातावरण निर्माण केलं. मात्र त्यानंतर जोरदार पुनरागमन करत दिपकने डेव्हिड मिलरचा त्रिफळा उडवला.

यानंतर विजयासाठी आवश्यक असलेल्या 26 धावा पूर्ण करणं पंजाबला जमलं नाही. अखेरीस चेन्नईने 22 धावांनी विजय मिळवत स्पर्धेत दणक्यात पुनरागमन केलं. चेन्नईकडून हरभजन सिंह आणि स्कॉट कुगलेजीनने प्रत्येकी 2-2, तर दिपक चहरने 1 बळी घेतला.

याआधी,पंजाबच्या गोलंदाजांनी टिच्चून केलेल्या माऱ्यामुळे पंजाबने चेन्नई सुपरकिंग्जला 160 धावांवर रोखण्यात यश मिळवलं. चेन्नई सुपरकिंग्जने घरच्या मैदानावर सामना खेळत असताना नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिस यांनी आश्वासक भागीदारी करुन दिली. मात्र रविचंद्रन आश्विनने शेन वॉटसनला माघारी धाडत चेन्नईला धक्का दिला.

यानंतर पंजाबच्या सर्व गोलंदाजांनी चेन्नईच्या फलंदाजांवर अंकुश लावला. डु प्लेसिस, सुरेश रैना देखील आश्विनच्या फिरकीचे शिकार होऊन माघारी परतले. यानंतर अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंह धोनीने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत संघाला 150 धावांचा पल्ला गाठून दिला. पंजाबकडून कर्णधार रविचंद्रन आश्विनने 3 बळी घेतले.

लोकसत्ता समालोचन

Live Blog

Highlights

  • 18:16 (IST)

    मयांक अग्रवालही माघारी, हरभजनला एकाच षटकात दुसरं यश

    उंच फटका खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या मयांक अग्रवाल डु प्लेसिसकडे झेल देऊन माघारी

  • 18:15 (IST)

    पंजाबला पहिला धक्का, ख्रिस गेल माघारी

    हरभजनसिंहच्या गोलंदाजीवर धोनीने घेतला झेल

  • 17:47 (IST)

    रायुडू-धोनी जोडीची छोटेखानी भागीदारी, पंजाबला 161 धावांचं आव्हान

    अखेरच्या षटकांमध्ये चेन्नईच्या फलंदाजांची फटकेबाजी

  • 16:43 (IST)

    चेन्नईला पहिला धक्का, वॉटसन माघारी

    रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात वॉटसन सॅम कुरनकडे झेल देत माघारी

  • 16:42 (IST)

    शेन वॉटसन - फाफ डु प्लेसिस जोडीची आश्वासक सुरुवात

    पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये 56 धावांची भागीदारी

19:48 (IST)06 Apr 2019
चेन्नई सुपरकिंग्ज सामन्यात विजयी

किंग्ज इलेव्हन पंजाबवर 22 धावांनी केली मात

19:37 (IST)06 Apr 2019
अखेरच्या षटकात सरफराज माघारी, पंजाबच्या आशांवर पाणी

कुगलेजीनने घेतला बळी

19:36 (IST)06 Apr 2019
19 व्या षटकात डेव्हिड मिलर माघारी

दिपक चहरने उडवला मिलरचा त्रिफळा, पंजाबला चौथा धक्का

19:13 (IST)06 Apr 2019
लोकेश राहुल - सरफराज खानचं अर्धशतक

पंजाबचा डाव सावरला, सामना रंगतदार अवस्थेत

18:16 (IST)06 Apr 2019
मयांक अग्रवालही माघारी, हरभजनला एकाच षटकात दुसरं यश

उंच फटका खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या मयांक अग्रवाल डु प्लेसिसकडे झेल देऊन माघारी

18:15 (IST)06 Apr 2019
पंजाबला पहिला धक्का, ख्रिस गेल माघारी

हरभजनसिंहच्या गोलंदाजीवर धोनीने घेतला झेल

17:47 (IST)06 Apr 2019
रायुडू-धोनी जोडीची छोटेखानी भागीदारी, पंजाबला 161 धावांचं आव्हान

अखेरच्या षटकांमध्ये चेन्नईच्या फलंदाजांची फटकेबाजी

17:09 (IST)06 Apr 2019
लागोपाठ रैना बाद, आश्विनला हॅटट्रीकची संधी

रैना त्रिफळाचीत होऊन माघारी, चेन्नईचा तिसरा गडी बाद

17:07 (IST)06 Apr 2019
चेन्नईला दुसरा धक्का, फॅफ डु प्लेसिस माघारी

रविचंद्रन आश्विनला सामन्यात दुसरा बळी

16:43 (IST)06 Apr 2019
चेन्नईला पहिला धक्का, वॉटसन माघारी

रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात वॉटसन सॅम कुरनकडे झेल देत माघारी

16:42 (IST)06 Apr 2019
शेन वॉटसन - फाफ डु प्लेसिस जोडीची आश्वासक सुरुवात

पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये 56 धावांची भागीदारी

15:43 (IST)06 Apr 2019
चेन्नईने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजीचा निर्णय

चेन्नईच्या संघात महत्वाचे 3 बदल

टॅग Csk,IPL 2019
Next Stories
1 IPL 2019 : चेन्नईच्या अडचणीत वाढ, महत्वाचा खेळाडू 2 आठवडे संघाबाहेर
2 गुढीपाडव्याला मुंबई इंडियन्सनं साजरी केली मकर संक्रांत, नेटीझन्सनी उडवली खिल्ली
3 चेन्नई-पंजाब लढतीत धोनी-अश्विन यांच्या नेतृत्वक्षमतेची लढाई
Just Now!
X