IPL 2019 CSK vs MI Live Updates : IPL २०१९ मध्ये दुसऱ्यांदा आमने सामने आलेल्या मुंबई – चेन्नई लढतीत मुंबईने चेन्नईवर ४६ धावांनी सहज विजय मिळवला. रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेशी अर्धशतकी (६७) खेळी करत मुंबईला १५५ धावांपर्यंत पोहोचवले आणि चेन्नईपुढे १५६ धावांचे आव्हान ठेवले. पण या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला केवळ १०९ धावाच करता आल्या. या विजयामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेतील दुसऱ्या स्थानी पोहोचला असून ‘प्ले-ऑफ्स’ फेरीसाठी त्यांची दावेदारी अधिक मजबूत झाली आहे.

मुंबईने दिलेल्या १५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शेन वॉटसनने ३ चेंडूत २ चौकार लगावत तडाखेबाज सुरुवात केली होती, पण पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. मलिंगाने त्याला चतुर गोलंदाजी करत माघारी धाडले. धोनीच्या जागी नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आलेला कर्णधार सुरेश रैना केवळ २ धावा करून झेलबाद झाला आणि चेन्नईला दुसरा धक्का बसला. उंच फटका मारताना तो माघारी परतला. प्रतिभावान फलंदाज अंबाती रायडू त्रिफळाचीत झाला. तो ३ चेंडू खेळला पण त्याला भोपळाही फोडता आला नाही. केदार जाधव खेळपट्टीवर स्थिरावत असताना त्याला कृणालने त्रिफळाचीत केले. केदारने ६ धावा केल्या. नव्या दमाच्या ध्रुव शोरे यांच्याकडून चेन्नईला अपेक्षा होत्या, पण तो मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. तो ५ धावा काढून माघारी परतला.

एकीकडे गडी झटपट बाद होताना एकाकी झुंज देणारा मुरली विजय १२ व्या षटकात झेलबाद झाला. पहिल्या सहा फलंदाजांमध्ये दुहेरी धावसंख्या गाठणारा तो एकमेव फलंदाज ठरला. विजयने ३ चौकार आणि १ षटकार यांच्या साहाय्याने ३८ धावा केल्या. मिचेल सँटनर आणि ब्राव्हो यांच्यात भागीदारी होण्यास सुरुवात होतानाच ब्राव्हो झेलबाद झाला. त्यामुळे चेन्नईच्या अडचणी वाढल्या. ब्राव्हो २० धावांवर माघारी परतला. त्यानंतर कोणीही फलंदाज फार काळ खेळपट्टीवर स्थिरावला नाही.

त्याआधी पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या मुंबईची सुरुवात चांगली झाली, मात्र मधल्या फळीतल्या फलंदाजांनी निराशा केल्यामुळे मुंबईला मोठी झेप घेता आली नाही. मुंबईच्या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात करत आपले इरादे स्पष्ट केले होते. मात्र क्विंटन डी-कॉक लवकर माघारी परतला. यानंतर एविन लुईसच्या साथीने रोहितने मुंबईचा डाव सावरला. रोहितने ४८ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६७ धावा केल्या. त्याला साथ देणाऱ्या एविन लुईसने ३२ धावा केल्या. मात्र लुईस माघारी परतल्यानंतर मुंबईच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी पुरती निराशा केली. आवश्यक धावगतीने खेळणं मुंबईच्या फलंदाजांना जमलं नाही.

मधल्या षटकांत चेन्नईच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांवर अंकुश लावला. अखेरीस हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड यांनी मुंबईला १५५ धावांपर्यंत मजल मारुन दिली. चेन्नईकडून मिचेल सँटनरने २, तर दिपक चहर आणि इम्रान ताहीरने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

Live Blog

00:02 (IST)27 Apr 2019
चेन्नईला नमवून मुंबई ‘किंग’; ४६ धावांनी विजयी

मुंबईचा संघ गुणतालिकेतील दुसऱ्या स्थानी पोहोचला असून ‘प्ले-ऑफ्स’ फेरीसाठी दावेदारी अधिक मजबूत

23:25 (IST)26 Apr 2019
चेन्नई पराभवाच्या छायेत; डावाला गळती

चेन्नई पराभवाच्या छायेत; डावाला गळती

23:18 (IST)26 Apr 2019
ब्राव्हो झेलबाद; चेन्नईच्या अडचणीत वाढ

मिचेल सँटनर आणि ब्राव्हो यांच्यात भागीदारी होण्यास सुरुवात होतानाच ब्राव्हो झेलबाद झाला. त्यामुळे चेन्नईच्या अडचणी वाढल्या. ब्राव्हो २० धावांवर माघारी परतला.

22:57 (IST)26 Apr 2019
मुरली विजय तंबूत; चेन्नईला सहावा धक्का

एकीकडे गडी झटपट बाद होताना एकाकी झुंज देणारा मुरली विजय १२ व्या षटकात झेलबाद झाला. पहिल्या सहा फलंदाजांमध्ये दुहेरी धावसंख्या गाठणारा तो एकमेव फलंदाज ठरला. विजयने ३ चौकार आणि १ षटकार यांच्या साहाय्याने ३८ धावा केल्या.

22:46 (IST)26 Apr 2019
ध्रुव शोरे झेलबाद; चेन्नईला पाचवा धक्का

नव्या दमाच्या ध्रुव शोरे यांच्याकडून चेन्नईला अपेक्षा होत्या, पण तो मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. तो ५ धावा काढून माघारी परतला.

22:33 (IST)26 Apr 2019
केदार जाधव बाद; चेन्नईला चौथा धक्का

केदार जाधव खेळपट्टीवर स्थिरावत असताना त्याला कृणालने त्रिफळाचीत केले. केदारने ६ धावा केल्या.

22:19 (IST)26 Apr 2019
रायडू त्रिफळाचीत; चेन्नईला तिसरा धक्का

प्रतिभावान फलंदाज अंबाती रायडू त्रिफळाचीत झाला. तो ३ चेंडू खेळला पण त्याला भोपळाही फोडता आला नाही.

22:13 (IST)26 Apr 2019
कर्णधार रैना झेलबाद; चेन्नईला दुसरा धक्का

धोनीच्या जागी नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आलेला कर्णधार सुरेश रैना केवळ २ धावा करून झेलबाद झाला आणि चेन्नईला दुसरा धक्का बसला. उंच फटका मारताना तो माघारी परतला.

22:01 (IST)26 Apr 2019
वॉटसन स्वस्तात माघारी; चेन्नईला पहिला धक्का

मुंबईने दिलेल्या १५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शेन वॉटसनने ३ चेंडूत २ चौकार लगावत तडाखेबाज सुरुवात केली होती, पण पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. मलिंगाने त्याला चतुर गोलंदाजी करत माघारी धाडले.

21:43 (IST)26 Apr 2019
मुंबईची १५५ धावांपर्यंत मजल

चेन्नईला विजयासाठी १५६ धावांचं आव्हान

21:22 (IST)26 Apr 2019
अखेर रोहित शर्मा माघारी, मुंबईला चौथा धक्का

मिचेल सँटनरने घेतला बळी

21:05 (IST)26 Apr 2019
मुंबईला तिसरा धक्का, कृणाल पांड्या माघारी

इम्रान ताहीरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पांड्या झेलबाद

21:03 (IST)26 Apr 2019
रोहित शर्माचं अर्धशतक

रोहित शर्माने संघाचा डाव सावरत आपलं अर्धशतक झळकावलं आहे

मुंबईने गाठला १०० धावांचा टप्पा

21:01 (IST)26 Apr 2019
मुंबईला दुसरा धक्का, एविन लुईस माघारी

मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर ब्राव्होने घेतला झेल

लुईस आणि रोहित शर्मामध्ये दुसऱ्या विकेटसाठी महत्वाची भागीदारी

20:24 (IST)26 Apr 2019
मुंबईला पहिला धक्का, डी-कॉक माघारी

दिपक चहरच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक अंबाती रायुडूने घेतला झेल

19:42 (IST)26 Apr 2019
चेन्नईची नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी

महेंद्रसिंह धोनीला पुन्हा एकदा विश्रांती

महत्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघांमध्ये बदल