दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात, बॉल टॅम्परिंग प्रकरणात वर्षभराच्या बंदीची शिक्षा भोगून पुनरागमन केलेल्या डेव्हिड वॉर्नरने फलंदाजीत आपला धडाकेबाज फॉर्म कायम ठेवला आहे. रविवारी घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध खेळत असताना वॉर्नरने बाराव्या हंगामात ५०० धावांचा टप्पा ओलांडला.

२०१८ साली बंदीचं वर्ष वगळता २०१४, २०१५, २०१६, २०१७ आणि २०१९ या वर्षांमध्ये वॉर्नरने आयपीएलमध्ये ५०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. कोलकात्याविरुद्ध सामन्यात वॉर्नरने जॉनी बेअरस्टोच्या साथीने शतकी भागीदारी रचताना अर्धशतक झळकावलं. वॉर्नरने ३८ चेंडूत ६७ धावा केल्या. या खेळीत ३ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. डेव्हिड वॉर्नरप्रमाणेच विराट कोहलीनेही आयपीएलमध्ये अशी कामगिरी केली आहे.

त्याआधी, ख्रिस लिनचे संयमी अर्धशतक आणि सुनील नरिन व रिंकू सिंग यांच्या उपयुक्त खेळीच्या बळावर कोलकात्याने २० षटकात ८ बाद १५९ धावा केल्या. मात्र हैदराबादला १६० धावांच्या आत रोखणं कोलकात्याच्या गोलंदाजांना जमलं नाही. ९ गडी राखून हैदराबादने सामन्यात विजय मिळवला.