IPL 2019 DC vs KKR : दिल्लीच्या फिरोझशाह कोटला स्टेडियमवर दिल्ली आणि कोलकाता यांच्यात झालेल्या सामन्यात Super Overच्या माध्यमातून दिल्लीच्या संघाने विजय मिळवला. २० षटकात सामना अनिर्णित राहिल्याने Super Over खेळवण्यात आली. दिल्लीने प्रथम फलंदाजी करत Super Over मध्ये १ बाद १० धावा केल्या आणि कोलकाताला ११ धावांचे आव्हान दिले. पण कोलकाताला केवळ ७ धावाच जमवता आल्या आणि दिल्लीने विजयावर शिक्कामोर्तब केले.

दिल्लीने या सामन्यात नाणेफेक जिंकली असून कर्णधार श्रेयस अय्यर याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रसलच्या ६२ तर कार्तिकच्या ५० धावा यांच्या जोरावर कोलकाताने २० षटकात ८ बाद १८५ धावा केल्या. त्यामुळे दिल्लीला विजयासाठी १८६ धावांची गरज होती. सलामीवीर शिखर धवन ८ चेंडूत १६ धावा करून बाद झाला. त्याने २ चौकार आणि १ षटकार लगावला. पण फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. सलामीवीर पृथ्वी शॉ ने ३० चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याच्या फटकेबाजीत ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर झेलबाद झाला आणि दिल्लीला दुसरा धक्का बसला. त्याने ३२ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. या खेळीत ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. पृथ्वीच्या शानदार धमाक्यामुळे सामना रंगतदार स्थितीत आला होता. मात्र या दरम्यान ऋषभ पंत बाद झाला. त्याने १५ चेंडूत ११ धावा केल्या. पृथ्वी शॉ ९९ धावांवर बाद झाला. त्याने ५५ चेंडूच्या खेळीत १२ चौकार आणि ३ षटकार मारले. प्रथमच संधी मिळालेला हनुमा विहारी लवकर झेलबाद झाला. शेवटच्या चेंडूवर २ धावा हव्या असताना दुसरी धाव घेताना दिल्लीचा फलंदाज धावबाद झाला.

त्याआधी, मराठमोळा निखिल नाईक फारसा प्रभाव पाडू शकला नाही. त्याने १६ चेंडूत ७ धावा केल्या आणि तो पायचीत झाला. त्याला पंचानी बाद ठरवल्यानंतर DRS मध्येही त्याला बाद देण्यात आले. अनुभवी फलंदाज रॉबिन उथप्पा पायचीत झाला. हर्षद पटेलने त्याला पायचीत केले आणि कोलकाताला दुसरा धक्का दिला. त्याने ६ चेंडूत ११ धावा केल्या. यात २ चौकारांचा समावेश होता. रॉबिन उथप्पा पाठोपाठ सलामीवीर ख्रिस लिनदेखील बाद झाला. ऋषभ पंतने यष्टिरक्षण करत त्याचा अप्रतिम झेल टिपला. त्याने १८ चेंडूत २० धावा केल्या. गेल्या २ सामन्यात उत्तम खेळी करणारा नितीश राणा स्वस्तात बाद झाला आणि कोलकाताचा ४ गडी माघारी परतला. त्याने केवळ १ धाव केली. रबाडाने सीमारेषेवर त्याचा उत्तम झेल टिपला. खेळपट्टीवर स्थिरावलेला शुभमन गिल धावचीत झाला. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करून योग्य दिशेला फेकलेल्या चेंडूमुळे तो बाद झाला. त्यामुळे ६१ धावांत कोलकात्याच्या निम्मा संघ माघारी परतला. ६१ धावांत ५ गडी बाद झाल्याने कोलकात्याची अवस्था फार बिकट होती. पण कर्णधार दिनेश कार्तिक आणि धडाकेबाज आंद्रे रसलची फटकेबाजी यांच्यामुळे १४ षटकात कोलकाताने शतकी मजल मारली. अर्धशतक पूर्ण करून मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करणारा आंद्रे रसल ६२ धावांवर माघारी परतला आणि कोलकाताचा सहावा गडी बाद झाला. त्याने केवळ २८ चेंडूत ही खेळी केली. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ६ षटकार खेचले. दिनेश कार्तिकने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत ३५ चेंडूत अर्धशतक लगावले पण अर्धशतकानंतर लगेचच कर्णधार कार्तिक झेलबाद झाला.

या सामन्यासाठी कोलकाताच्या संघात १ मोठा बदल करण्यात आला होता. सलामीला फलंदाजी करणारा विंडीजचा प्रभावी फिरकीपटू सुनील नरिन याला संघाबाहेर व्हावे लागले. त्याच्या जागी मराठमोळ्या निखिल नाईकला संघात स्थान मिळाले. दिल्लीच्या संघात ४ महत्वाचे बदल करण्यात आले होते. किमो पॉल, राहुल तेवतिया, अक्षर पटेल, इशांत शर्मा या खेळाडूंना संघाबाहेर करण्यात आले आहे. विंडीजच्या किमो पॉलच्या जागी हनुमा विहारीला मधल्या फळीत स्थान मिळाले. फिरकीपटू राहुल तेवतिया आणि अक्षर पटेल यांच्या जागी नेपाळचा फिरकीपटू संदीप लामीचन्ने आणि मध्यमगती गोलंदाज हर्षल पटेल यांना स्थान मिळाले. तर वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस याला संधी देण्यात आली.

 

Live Blog

00:17 (IST)31 Mar 2019
कोलकाता सुपर ओव्हर - १ बाद ७; Super Over मध्ये दिल्ली विजयी

पहिला चेंडू - चौकार (रसल)

दुसरा चेंडू - निर्धाव (रसल)

तिसरा चेंडू - त्रिफळाचीत (रसल)

चौथा चेंडू - १ धाव (उथप्पा)

पाचवा चेंडू - १ धावा (कार्तिक)

सहावा चेंडू - १ धाव (उथप्पा)

गोलंदाज - कागिसो रबाडा

00:05 (IST)31 Mar 2019
दिल्ली सुपर ओव्हर - १ बाद १०; विजयासाठी कोलकाताला ११ धावांची गरज

पहिला चेंडू - १ धाव (पंत)

दुसरा चेंडू - चौकार (अय्यर)

तिसरा चेंडू - श्रेयस अय्यर झेलबाद

चौथा चेंडू - २ धावा (पंत)

पाचवा चेंडू - २ धावा (पंत)

सहावा चेंडू - १ धाव (पंत)

गोलंदाज - प्रसीद्ध कृष्ण

23:59 (IST)30 Mar 2019
सुपर ओव्हर मध्ये दिल्लीची प्रथम फलंदाजी; पंत, अय्यर फलंदाजीला मैदानात

सुपर ओव्हरमध्ये दिल्लीला प्रथम फलंदाजी देण्यात आली आहे. धडाकेबाज ऋषभ पंत आणि कर्णधार श्रेयस अय्यर हे फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत. तर कोलकाताकडून गोलंदाजीची जबाबदारी प्रसीद्ध कृष्णा याच्यावर आहे.

23:52 (IST)30 Mar 2019
सामना अनिर्णित; Super Over मध्ये होणार निर्णय

२० षटकात सामना अनिर्णित राहिल्याने आता सामन्याचा निकाल Super Over च्या माध्यमातून लागणार. शेवटच्या चेंडूवर २ धावा हव्या असताना दुसरी धाव घेताना दिल्लीचा फलंदाज धावबाद झाला.

23:49 (IST)30 Mar 2019
पृथ्वी, हनुमा विहारी बाद; दिल्लीला १ चेंडूत २ धावांची गरज

पृथ्वी शॉ ९९ धावांवर बाद झाला. त्याने ५५ चेंडूच्या खेळीत १२ चौकार आणि ३ षटकार मारले. प्रथमच संधी मिळालेला हनुमा विहारी लवकर झेलबाद झाला. आता दिल्लीला १ चेंडूत २ धावांची गरज आहे.

23:46 (IST)30 Mar 2019
ऋषभ पंत बाद; सामना रंगतदार स्थितीत

पृथ्वीच्या 'शॉ'नदार धमाक्यामुळे सामना रंगतदार स्थितीत आला. मात्र या दरम्यान ऋषभ पंत बाद झाला.  त्याने १५ चेंडूत ११ धावा केल्या.

23:09 (IST)30 Mar 2019
कर्णधार श्रेयस अय्यर माघारी, दिल्लीला दुसरा धक्का

कर्णधार श्रेयस अय्यर झेलबाद झाला आणि दिल्लीला दुसरा धक्का बसला. त्याने ३२ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. या खेळीत ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.

22:59 (IST)30 Mar 2019
पृथ्वी शॉ चे अर्धशतक; दिल्लीची शतकी मजल

सलामीवीर पृथ्वी शॉ ने ३० चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याच्या फटकेबाजीत ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. आता त्याच्याकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे.

22:47 (IST)30 Mar 2019
सातव्या षटकात दिल्लीचे अर्धशतक

सातव्या षटकात दिल्लीचे अर्धशतक

22:27 (IST)30 Mar 2019
सलामीवीर धवन झेलबाद; दिल्लीला पहिला धक्का

सलामीवीर शिखर धवन ८ चेंडूत १६ धावा करून बाद झाला. त्याने २ चौकार आणि १ षटकार लगावला. पण फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला.

21:56 (IST)30 Mar 2019
रसल-कार्तिकचा दणका; दिल्लीपुढे १८६ धावांचे लक्ष्य

दिल्लीच्या फिरोझशाह कोटला स्टेडियमवर दिल्ली विरुद्धच्या सामन्यात रसलच्या ६२ तर कार्तिकच्या ५० धावा यांच्या जोरावर कोलकाताने २० षटकात ८ बाद १८५ धावा केल्या. त्यामुळे दिल्लीला विजयासाठी १८६ धावांची गरज आहे.

21:49 (IST)30 Mar 2019
अर्धशतकानंतर लगेचच कर्णधार कार्तिक झेलबाद

दिनेश कार्तिकने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत ३५ चेंडूत अर्धशतक लगावले पण अर्धशतकानंतर लगेचच कर्णधार कार्तिक झेलबाद झाला.

21:44 (IST)30 Mar 2019
अर्धशतक ठोकून रसल माघारी; कोलकाताचा सहावा गडी बाद

अर्धशतक पूर्ण करून मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करणारा आंद्रे रसल ६२ धावांवर माघारी परतला आणि कोलकाताचा सहावा गडी बाद झाला. त्याने केवळ २८ चेंडूत ही खेळी केली. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ६ षटकार खेचले.

21:37 (IST)30 Mar 2019
रसलचा झंझावात; २३ चेंडूत अर्धशतक

२ चौकार आणि ६ षटकार ठोकत केले अर्धशतक

21:12 (IST)30 Mar 2019
कार्तिक-रसलची फटकेबाजी; १४ षटकात शतकी मजल

६१ धावांत ५ गडी बाद झाल्याने कोलकात्याची अवस्था फार बिकट होती. पण कर्णधार दिनेश कार्तिक आणि धडाकेबाज आंद्रे रसलची फटकेबाजी यांच्यामुळे १४ षटकात कोलकाताने शतकी मजल मारली.

20:50 (IST)30 Mar 2019
शुभमन गिल बाद; कोलकात्याच्या निम्मा संघ माघारी

खेळपट्टीवर स्थिरावलेला शुभमन गिल धावचीत झाला. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करून योग्य दिशेला फेकलेल्या चेंडूमुळे तो बाद झाला. त्यामुळे ६१ धावांत कोलकात्याच्या निम्मा संघ माघारी परतला. आता दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसल यांच्यावर कोलकाताची मदार आहे.

20:37 (IST)30 Mar 2019
नितीश राणा झेलबाद; कोलकाताचे ४ गडी माघारी

गेल्या २ सामन्यात उत्तम खेळी करणारा नितीश राणा स्वस्तात बाद झाला आणि कोलकाताचा ४ गडी माघारी परतला. त्याने केवळ १ धाव केली. रबाडाने सीमारेषेवर त्याचा उत्तम झेल टिपला.

20:36 (IST)30 Mar 2019
उथप्पा पाठोपाठ लिन बाद; कोलकाताचे ३ गडी माघारी

रॉबिन उथप्पा पाठोपाठ सलामीवीर ख्रिस लिनदेखील बाद झाला. ऋषभ पंतने यष्टिरक्षण करत त्याचा अप्रतिम झेल टिपला. त्याने १८ चेंडूत २० धावा केल्या.

20:30 (IST)30 Mar 2019
रॉबिन उथप्पा पायचीत; कोलकाताला दुसरा धक्का

अनुभवी फलंदाज रॉबिन उथप्पा पायचीत झाला. हर्षद पटेलने त्याला पायचीत केले आणि कोलकाताला दुसरा धक्का दिला. त्याने ६ चेंडूत ११ धावा केल्या. यात २ चौकारांचा समावेश होता.

20:26 (IST)30 Mar 2019
निखिल नाईक पायचीत; कोलकाताला पहिला धक्का

मराठमोळा निखिल नाईक फारसा प्रभाव पाडू शकला नाही. त्याने १६ चेंडूत ७ धावा केल्या आणि तो पायचीत झाला. त्याला पंचानी बाद ठरवल्यानंतर DRS मध्येही त्याला बाद देण्यात आले.

19:55 (IST)30 Mar 2019
कोलकाताच्या संघात १ मोठा बदल

कोलकाताच्या संघात १ मोठा बदल करण्यात आलेला आहे. सलामीला फलंदाजी करणारा विंडीजचा प्रभावी फिरकीपटू सुनील नरिन याला संघाबाहेर व्हावे लागले आहे. त्याच्या जागी निखिल नाईकला संघात स्थान मिळाले आहे.

19:44 (IST)30 Mar 2019
दिल्लीच्या संघात ४ बदल

दिल्लीच्या संघात ४ महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. किमो पॉल, राहुल तेवतिया, अक्षर पटेल, इशांत शर्मा या खेळाडूंना संघाबाहेर करण्यात आले आहे. विंडीजच्या किमो पॉलच्या जागी हनुमा विहारीला मधल्या फळीत स्थान मिळाले आहे. फिरकीपटू राहुल तेवतिया आणि अक्षर पटेल यांच्या जागी नेपाळचा फिरकीपटू संदीप लामीचन्ने आणि मध्यमगती गोलंदाज हर्षल पटेल यांना स्थान मिळाले आहे. तर वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस याला संधी देण्यात आली आहे.

19:38 (IST)30 Mar 2019
नाणेफेक जिंकून दिल्लीची प्रथम गोलंदाजी

गेल्या सामन्यात चेन्नईकडून पराभूत झालेल्या दिल्लीने या सामन्यात नाणेफेक जिंकली असून कर्णधार श्रेयस अय्यर याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.