IPL 2019 DC vs KKR : दिल्लीच्या फिरोझशाह कोटला स्टेडियमवर दिल्ली आणि कोलकाता यांच्यात झालेल्या सामन्यात Super Overच्या माध्यमातून दिल्लीच्या संघाने विजय मिळवला. २० षटकात सामना अनिर्णित राहिल्याने या हंगामातील पहिली Super Over खेळवण्यात आली. दिल्लीने प्रथम फलंदाजी करत Super Over मध्ये १ बाद १० धावा केल्या आणि कोलकाताला ११ धावांचे आव्हान दिले. पण कोलकाताला केवळ ७ धावाच जमवता आल्या आणि दिल्लीने विजयावर शिक्कामोर्तब केले.

Super Over चा थरार

सुपर ओव्हरमध्ये दिल्लीला प्रथम फलंदाजी देण्यात आली. धडाकेबाज ऋषभ पंत आणि कर्णधार श्रेयस अय्यर हे फलंदाजीसाठी मैदानात उतरले. तर कोलकाताकडून गोलंदाजीची जबाबदारी प्रसीद्ध कृष्णा याच्यावर होती.

दिल्ली सुपर ओव्हर – १ बाद १०

पहिला चेंडू – १ धाव (पंत)

दुसरा चेंडू – चौकार (अय्यर)

तिसरा चेंडू – श्रेयस अय्यर झेलबाद

चौथा चेंडू – २ धावा (पंत)

पाचवा चेंडू – २ धावा (पंत)

सहावा चेंडू – १ धाव (पंत)

गोलंदाज – प्रसीद्ध कृष्ण

दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये १ बाद १० धावा केल्या आणि विजयासाठी कोलकाताला ११ धावांचे आव्हान दिले. कोलकाताकडून आंद्रे रसल आणि कर्णधार कार्तिक मैदानात आले.

कोलकाता सुपर ओव्हर – १ बाद ७

पहिला चेंडू – चौकार (रसल)

दुसरा चेंडू – निर्धाव (रसल)

तिसरा चेंडू – त्रिफळाचीत (रसल)

चौथा चेंडू – १ धाव (उथप्पा)

पाचवा चेंडू – १ धावा (कार्तिक)

सहावा चेंडू – १ धाव (उथप्पा)

गोलंदाज – कागिसो रबाडा

कोलकाताला सुपर ओव्हरमध्ये १ बाद ७ धावांपर्य़ंतच मजल मारता आली. त्यामुळे Super Over मध्ये दिल्ली विजयी ठरली.